Thursday, April 25, 2024
Homeनाशिककोरोना बाधित रुग्ण वाढले; एकट्या मालेगावात ९६ रुग्ण बाधित; आतापर्यंत ८ दगावले

कोरोना बाधित रुग्ण वाढले; एकट्या मालेगावात ९६ रुग्ण बाधित; आतापर्यंत ८ दगावले

नाशिक | प्रतिनिधी 

मालेगावमध्ये काल रात्री पुन्हा नऊ रुग्ण कोरोनाबाधित आढळून आले असतानाच मध्यरात्री प्राप्त अहवालात आणखी दोन अहवाल बाधित सिद्ध झाले आहेत. त्यामुळे मालेगावमधील बाधित रुग्णांची एकूण संख्या ९६ वर पोहोचली आहे. तर आतापर्यंत मालेगावात ८ रुग्ण दगावले आहेत. वाढलेल्या बाधितांच्या संख्येमुळे  नाशिक जिल्ह्यातील बाधितांचा आकडा ९९ वरून १०८ आणि आता १०८ वरून ११० वर पोहोचला आहे.

- Advertisement -

आज मालेगावमध्ये बाधितांची जी संख्या वाढली आहे. यामध्ये ७ महिला तर दोन पुरुषांचा समावेश आहे. हे रुग्ण कोणत्या परिसरातील आहेत याबाबतची कुठलीही माहिती मिळू शकली नाही. तसेच मध्यरात्री वाढलेले रुग्ण कुठल्या परीरातील आणि कोणत्या वयोगटातील आहेत याबाबतही माहिती उपलब्ध होऊ शकली नाही.

मालेगावमध्ये सर्वत्र कडक संचारबंदी असूनही रुग्ण वाढल्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे. शहरातील अटकाव क्षेत्रांमध्ये वाढ झाली असून अतिरिक्त बंदोबस्ताचा पोलिसांवर ताण आला आहे. दुसरीकडे अटकाव क्षेत्रामध्ये आरोग्य यंत्रणेलादेखील रुग्ण तपासणीसाठी मोठी कसरत करावी लागत आहे.

नाशिक जिल्ह्यातील इतर तालुक्यांत बाधितांची संख्या चार असून यात एक रुग्ण कोरोनामुक्त झाला आहे. तर मालेगावी एकूण ९६ रुग्ण कोरोनाबाधित आढळून आले असून यामध्ये एकूण ८ रुग्णांचा दुर्दैवी मृत्यु झाला आहे.

मध्यरात्रीनंतर उशिरा मालेगाव मध्ये आणखी 2 पॉसिटीव्ह रुग्ण आढळले. त्यानंतरची नाशिक जिल्ह्यातील स्थिती अशी.

NASHIK DISTRICT

Positive Total:110

Nashik Corporation:
Positive:10
Death:00
Recovered:01

Nashik Rural:
Positive:04
Death:00
Recovered:01

Malegaon Corporation:
Positive: 96
Death:08

- Advertisment -

ताज्या बातम्या