करोनामुळे रखडलेल्या 850 गृहप्रकल्पांना मनपाकडून परवानगी; नगरचना विभागाकडे नवीन 15 प्रकल्प प्रस्ताव दाखल
स्थानिक बातम्या

करोनामुळे रखडलेल्या 850 गृहप्रकल्पांना मनपाकडून परवानगी; नगरचना विभागाकडे नवीन 15 प्रकल्प प्रस्ताव दाखल

Dinesh Sonawane

Dinesh Sonawane

नाशिक । प्रतिनिधी

करोनाच्या पार्श्वभुमीवर देशभरात लागु झालेल्या लॉकडाऊनच्या तिसर्‍या टप्प्यापर्यत थांबविण्यात आलेली बांधकामांच्या साईट सुरू करण्यात शासनाने सामाजिक अंतराचे नियमांचे पालनासह सशर्त मंजुरी दिली होती.

याच पार्श्वभूमीवर महापालिक नगररचना विभागाकडे आलेल्या अर्जानुसार शहरातील एकुण 850 गृह प्रकल्पांना परवानगी देण्यात आली आहे. तसेच गेल्या आठवडाभरात नवीन 15 प्रस्तावही नगररचनाकडे दाखल झाले आहे. यामुळे आता बांधकाम व्यावसायाला चालना मिळाली आहे.

करोनाच्या पार्श्वभूमीवर शहरात थांबलेल्या बांधकाम साईटवरील कामे सुरू करण्यासंदर्भात राज्य शासनाने 17 एप्रिल 2020 रोजी आदेश काढत महापालिका नगररचना विभागाकडे अर्ज करुन सशर्त परवानगी घेऊन कामे करण्यास सांगण्यात आले होते. यानुसार महापालिका नगररचना विभागाकडे बांधकाम व्यावसायिक व आर्किटक्ट यांनी बांधकामासाठी अर्ज केले.

या अर्जानुसार नगररचना विभागाकडुन बांधकाम साईट व कामगारांची व्यवस्थेची पाहणी करण्यात आल्यानंतर अटी शर्ती प्रमाणे स्थिती व कामगारांची व्यवस्था आदी बाबी व्यावसायिकांना बांधकामांसाठी परवानगी दिली जात आहे. आत्तापर्यत नगररचना विभागाकडुन 850 गृह प्रकल्पांना सामाजिक अंतराच्या नियमांसह अटी शर्थी नुसार परवानगी देण्यात आली आहे.

परिणामी शहरातील थांबलेल्या बांधकाम व्यावसायाला आता चालना मिळणार आहे. तसेच करोनाच्या पार्श्वभूमीवर नगररचना विभागाकडुन नवीन बांधकामांच्या परवानगीची कामे ठप्प झाली होती. आता मात्र नवीन प्रकल्पांना परवानगी देण्याचे काम सुरू झाले असुन गेल्या आठवड्यात नवीन 15 प्रस्ताव दाखल करुन घेण्यात आले आहे.

करोना (कोव्हीड-19) व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी शासनाच्या आदेशानुसार लॉकडाऊन काळात बांधकामांना बंदी घालण्यात आली होती. परिणामी बांधकामावर काम करणारा परप्रातीय मजुर – कामगार आपल्यागावाकडे निघुन गेले आहे. यामुळे राज्यातील बांधकाम व्यावसाय ठप्प झाला आहे.

आता मात्र बांधकाम व्यावसायिकांना स्थानिक मजुरांना घेऊन आणि काही याच ठिकाणी थांबलेल्या परप्रांतीय मंजुराच्या साह्याने बांधकाम साईट सुरु केल्या आहे. तसेच आपल्या गावी गेलेल्या परप्रांतीय मजुरांचे बांधकाम व्यावसायिकांना आणि ठेकेदारांना फोन करीत परतण्याची इच्छा व्यक्त करीत आहे. रेल्वे गाड्या सुरू झाल्यानंतर परप्रांतीय मजुर इकडे परततील अशी आशा बांधकाम व्यावसायिक बाळगुन आहे.

Deshdoot
www.deshdoot.com