नंदुरबार : जिल्ह्यात एकाच दिवशी आढळले ८ करोना रुग्ण

नंदुरबार : जिल्ह्यात एकाच दिवशी आढळले ८ करोना रुग्ण

नंदुरबार जिल्ह्यात आज एकाच दिवशी 8 जण कोरोना पॉझिटीव्ह आढळून आल्याने खळखळ उडाली आहे. यात रजाळे येथील 5, जिल्हा रुग्णालयातील 2 तर शिंदखेडा तालुक्यातील एका रुग्णाचा समावेश आहे.

नंदुरबार जिल्ह्यात 17 एप्रिल ते 8 मे दरम्यान 21 रुग्ण कोरोनाबाधित आढळून आले होते. यापैकी 2 जणांचा मृत्यू झाला तर 19 रुग्नानी कोरोनावर मात केली. त्यामुळे नंदुरबार जिल्हा कोरोनामुक्त झाला होता. परंतु तीन दिवसांपूर्वी नंदुरबार तालुक्यातील रजाळे येथील 66 वर्षीय इसम कोरोनाबाधीत आढळून आला. तो महिनाभर मुंबई येथे आपल्या मुलीकडे राहुन आला होता.

त्याची तपासणी केली असता तो कोरोना पॉझिटीव्ह आढळून आला. त्यामुळे त्याच्या संपर्कातील 14 जणाना क्वारंटाइन करण्यात आले होते. त्यातील काही जणांचे स्वब घेण्यात आले. त्यांचा आज कोरोना अहवाल प्राप्त झाला असून त्यातील 8 जण कोरोनाबाधीत आढळून आले आहेत.

यात रजाळे येथील 28 वर्षीय महिला, 31 वर्षीय पुरुष, 55 वर्षीय महिला, 31 वर्षीय पुरुष, 6वर्षीय बालिका, जिल्हा रुग्णालयातील 27 व 32 वर्षीय पुरुष कर्मचारी तसेच शिंदखेडा तालुक्यातील 35 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.एकाच दिवशी जिल्ह्यात 8 रुग्ण आढळून आल्याने जिल्ह्यात खळखळ उडाली आहे.

Deshdoot
www.deshdoot.com