नाशिक जिल्ह्यात करोनाग्रस्तांची संख्या ७९६ वर; नव्या १२ रूग्णांची भर तर ११ रुग्ण करोनामुक्त
स्थानिक बातम्या

नाशिक जिल्ह्यात करोनाग्रस्तांची संख्या ७९६ वर; नव्या १२ रूग्णांची भर तर ११ रुग्ण करोनामुक्त

Dinesh Sonawane

Dinesh Sonawane

नाशिक । प्रतिनिधी 

जिल्ह्यात मालेगाव, नाशिक शहरासह जिल्ह्याच्या इतर भागातही करोनाचा प्रसार वेगाने होत असून आज मनमाड, दिंडोरी, निफाड या तालुक्यांतील विविध नव्या गावांमध्ये करोनाचे पॉझिटिव्ह रूग्ण आढळले आहेत. आज जिल्ह्यात नव्याने 12 रूग्णांची भर पडली आहे. यामध्ये यामुळे जिल्ह्याचा आकडा 796 झाला आहे. तर रात्रीपासून आतापर्यत 6 जणांचा मृत्यू झाला असून सर्व मालेगाव येथील आहेत. यामुळे जिल्ह्यात करोनाचे 45 बळी झाले आहेत. तर आज पुन्हा 11 रूग्णांनी करोनावर मात केली असून आतापर्यंत 548 करोना रूग्ण पुर्णपणे बरे झाले आहेत.

मालेगावची करोना बाधीतांची संख्या मोठ्या वेगाने वाढत असून यात आज 7 जणांची भर पडली. यामुळे मालेगावचा आकडा मालेगाव, नाशिक शहरासह जिल्ह्याच्या इतर भागातही करोनाचा प्रसार वेगाने होत आहे. आज जिल्ह्यात 11 रूग्ण बरे झाले आहेत.

आज आढळलेल्या 12 रूग्णांमध्ये मालेगाव येथील 7 तर मनमाड येथील दोन, निफाडच्या विष्णुनगर येथील 1, कसबे सुकेने येथील 1, सिन्नर तालुक्यातील नांदुर शिंगोटे येथील 1, रूग्ण आढळून आले आहेत. यासह उर्वरीत जिल्ह्यात 103 पॉझिटिव्ह रूग्ण झाले आहेत. तर यात जिल्ह्या बाहेरील 30 जणांचा समावेश आहे. यातील 28 जण करोनामुक्त झाले आहेत.

दरम्यान, जिल्ह्यात आजपर्यंत 38 हजार 709 संशयित रूग्णांचे स्क्रीनींग करण्यात आले आहे. जिल्ह्यातून आजपर्यंत 7 हजार 381 स्वॅब तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. यातील 6 हजार 322 निगेटिव्ह, 796 पॉझिटिव्ह आले आहेत. यातील 122 रूग्ण उपचार घेत आहेत. तर अद्याप 268 अहवाल प्रलबिंत आहेत.

करोना मुक्त रूग्ण असे

* मालेगाव : 428
* नाशिक : 32
* उर्वरित जिल्हा : 60
* जिल्हा बाह्य : 28
* एकुण कोरोनमुक्त : 548

जिल्हा प्रशासनाच्या अहवालानुसार

* एकूण कोरोना बाधित: 796
* मालेगाव : 617
* नाशिक : 46
* उर्वरित जिल्हा : 103
* एकूण मृत्यू: 42
* कोरोनमुक्त : 548

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com