यंदा विवाहासाठी ७८ विवाह मुहुर्त; जाणून घ्या तारखा
स्थानिक बातम्या

यंदा विवाहासाठी ७८ विवाह मुहुर्त; जाणून घ्या तारखा

Gaurav Pardeshi

Gaurav Pardeshi

नाशिक । प्रतिनिधी

11 नोव्हेंबरला तुळशी विवाह झाल्यानंतर विवाह सोहळ्यांना सुरुवात झाली आहे. जुलैपर्यंत लग्नासाठी 78 मुहूर्त आहेत. तुळशी विवाहानंतर लग्नसराईला प्रारंभ होत असतो. यंदा बर्‍यापैकी मुहूर्त असल्याने लग्नाची जमवतानाच वधू-वरांचे पालक आतापासून मंगल कार्यालये, केटरर्सचे बुकिंग करायला प्राधान्य देत आहेत.

शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागातदेखील विवाह सोहळ्याचे ट्रेडिंग होत असल्याचे चित्र आहे. वैदिक संस्कृतीत लग्न संस्कार महत्त्वाचा मानला जातो. लग्नाचे क्षण अविस्मरणीय असावेत यासाठी इव्हेन्ट मॅनेजर्सचेदेखील सल्ले घेतले जात असून शक्यतो लॉन्सवरच सोहळे आयोजित करण्याला प्राधान्य देण्यात येत आहे.

नोव्हेंबर महिन्यात दि. 16, 21, 23, 25, 26, डिसेंबर महिन्यात दि. 2, 3, 4, 5, 6, 8, 14, 18, 19, 20, 24 या तारखांना विवाह मुहूर्त आहेत. तर पुढील वर्षी जानेवारी महिन्यात दि. 17, 18 , 19, 20, 23, 24, 29 तर फेब्रुवारी महिन्यात दि. 2, 3, 5, 6, 11, 13, 14, 16, 17, 19, 21, 28, मार्च महिन्यात 1, 2, 5, 6, 10, 11, 14, 15, 16, 18 या तारखा लग्नासाठी शुभ आहेत.

एप्रिल महिन्यातील दि. 17, 19, 20, 21, मे महिन्यात दि. 4, 7, 8, 9, 14, 16, 17, 19, 21, 22, 23, 27,31 व जून महिन्यात दि. 2, 3, 5, 6, 8, 10, 12, 15, 17, 18, 19, 20, 28 या दिवशी लग्नमुहूर्त आहेत. मे आणि जून या दोन महिन्यात प्रत्येकी 13 असे सर्वाधिक मुहूर्त आहेत. जुलै महिन्यातदेखील दि. 1, 2, 3 ला विवाह मुहूर्त साधता येणार आहेत.

Deshdoot
www.deshdoot.com