Thursday, April 25, 2024
Homeनाशिकआज दिवसभरात नाशिकमध्ये ७१ रुग्ण करोना पाॅझिटिव्ह; शहरात सर्वाधिक ६१, मालेगावी...

आज दिवसभरात नाशिकमध्ये ७१ रुग्ण करोना पाॅझिटिव्ह; शहरात सर्वाधिक ६१, मालेगावी ६, इगतपुरीत ३ तर नांदगाव एक रुग्ण बाधित

नाशिक । प्रतिनिधी

नाशिक शहर व ग्रामिण भागात करोनाच्या प्रसाराचा वेग वाढत आहे. यासह करोनामुळे मृत्यू होणारांचे प्रमाणही वाढत चालले असून जिल्ह्यात आज 4 जणांचा मृत्यू झाला असून करोनाबळींची संख्या आता शतकाकडे वाटचाल करताना दिसून येत आहे. आतापर्यंत जिल्ह्यात ९७ रुग्ण करोनाने दगावले आहेत. यात नाशिक शहरातील २० जण आहेत. जिल्ह्यात आज ७१ नव्या रूग्णांचे अहवाल करोना पॉझिटिव्ह आले आहेत.यामुळे जिल्ह्याचा करोनाग्रस्तांचा आकडा १५८८  इतका झाला आहे.

- Advertisement -

करोनाचा हॉटस्पॉट ठरलेल्या मालेगावात करोना नियंत्रणात येत असताना नाशिक शहरात तसेच ग्रामिण भागात मात्र करोनाचा उद्रेक सुरू झाला आहे. तसेच मृत्युचे प्रमाणही वाढत आहे. मृत्यूमध्ये आतपार्यंत सर्वाधिक ६४ मृत्यू मालेगाव येथे झाले आहेत. तर नाशिक शहरातील २० जणांचा मृत्यू झाला आहे. ग्रामिण भागातील ८ तर जिल्हाबाह्य ५ जण करोनामुळे मृत्यू झाले आहेत यामुळे मृत्यूचा आकडा ९७ झाला आहे.

आज जिल्ह्याभरात नव्याने ७१ रूग्णांची भर पडली. यामध्ये नाशिक शहरातील ६१ अहवालांचा सामावेश आहे. यात टाकळीरोडवरील चक्रधर सोसायटी येथील ४, मदिना चौक ३, भाभानगर १, कोकणीपुरा १, दुधबाजार १, अशोका हॉस्पीटल २, पखालरोड ७, जाधव संकुल १, सातपूर कॉलनी ५, नाईकवाडीपुरा ६, भगवतीनगर, हिरावाडी २, भराडवाडी २, म्हसरूळ स्नेहनगर ३, नाईकवाडीपुरा २, अशोका मार्ग १, बागवानपुरा १, शिवशक्ती चौक १, राजनत्ननगर २, काठेगल्ली २, मायको हॉस्पीटल, दिंडोरी रोड १, वडाळारोड १ येथील रूग्णांचा सामावेश आहे. यामुळे नाशिकशहराचा आकडा ४२७ वर पोहचला आहे.

ग्रामिण भागातील मालेगाव तालुक्यातील द्याने १, संगमेश्वर २, नांदगावच्या संभाजीनगर येथील १ तर इगतपूरी येथील बॉम्बे हॉटेलच्या मागे २ असे रूग्ण आहेत यामुळे ग्रामिण भागातील रूग्णांचा आकडा २६० झाला आहे. तसेच जिल्ह्यात आज ४० रूग्ण करोना मुक्त झाले असून रुग्ण बरे होणाऱ्यांचा आकडा १०४६ वर पोहचला आहे.

दरम्यान, जिल्ह्यात आजपर्यंत १३ हजार ४६६ स्वॅब तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. यातील ११ हजार ६१६ निगेटिव्ह आले आहेत, १५३६ पॉझिटिव्ह आले आहेत. यातील ३९३ रूग्ण उपचार घेत आहेत. तर अद्याप २३३ अहवाल प्रलबिंत आहेत. दरम्यान आज नव्याने ९२ संशयित रूग्ण दाखल झाले आहेत. यात नाशिक शहरातील ३२, जिल्हा रूग्णालय ५, ग्रामिण ४४, मालेगाव ११ संशयित रूग्णांचा सामावेश आहे.

जिल्हा प्रशासनाच्या अहवालानुसार
* एकूण कोरोना बाधित: १५८८
* मालेगाव : ८३४
* नाशिक : ४२७
* उर्वरित जिल्हा : २६०
* जिल्हा बाह्य ः ६४
* एकूण मृत्यू: ९७
* कोरोनमुक्त : १०४६

- Advertisment -

ताज्या बातम्या