धुळ्यातून ७ जण पळाले

जिल्ह्यात आज 19 नवे रुग्ण

शहरातील शासकीय तंत्रनिकेतन मुलांचे वसतीगृहात असलेल्या क्वारंटाईन सेंटरमधून काल रात्री सात जणांनी पलायन केले. याबाबत देवपूर पोलिस ठाण्यात सात जणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर आज सायंकाळी प्राप्त झालेल्या अहवालानुसार जिल्ह्यात 19 रूग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यात शिरपूर शहरातील नऊ तर दोंडाईचातील दहा रूग्णांचा समावेश आहे.

जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या 267 वर गेली आहे. तसेच धुळे महापालिका क्षेत्रात एकुण 76 कंटेनमेंट झोन जाहिर करण्यात आले आहेत.

सात जण पळाले

महापालिका प्रशासनाने हाय रिक्स व लो रिक्स यांच्यासाठी देवपूरातील शासकीय तंत्रनिकेतन मुलांचे वसतीगृह येथे क्वारंटाईन सेंटर उभारले आहे. या ठिकाणी महापालिकेतर्फे राहण्याची व जेवणाची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. परंतू दि. 7 जुन रोजी रात्री 8.15 वाजता या सेंटरमधून निखिल संजय जाधव (वय 26 रा. सोन्या मारूती चाळ), निरज संजय जाधव (वय 26 रा. सोन्या मारूती चाळ), चंद्रकांत बाबुलाल खेडवन (वय 51), प्रियंका चंद्रकांत खेडवन (वय 13), भावना चंद्रकांत खेडवन (वय 18), दीपाली चंद्रकांत खेडवन (वय 40) आणि तेजस चंद्रकांत खेडवन (वय 7) सर्व रा. समता नगर, साक्रीरोड, धुळे हे सात जण सेंटरमध्ये कोणाला न सांगता जावू लागले. म्हणून तेथे नियुक्तीला असलेले प्रमोद चव्हाण यांनी डॉ. महेश मोरे यांना सदर घटनेची माहिती दिली. त्यांनी मोबाईलव्दारे त्या सात जणांचे समुपदेशन केले. परंतू तरीही या सर्वांनी पलायन केले. यामुळे शहरात कोरोना आजार पसरण्याची शक्यता आहे. अशी फिर्याद प्रमोद चव्हाण यांनी देवपूर पोलिसात दिली. त्यावरून या सात जणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नवीन 19 रुग्ण आढळले

आज सायंकाळी प्राप्त झालेल्या अहवालानुसार जिल्ह्यात 19 रूग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यात दोंडाईचा शहरातील 74 वर्षीय महिला, 63 वर्षीय महिला, 33 वर्षीय महिला, 44 वर्षीय महिला, 25 वर्षीय पुरुष, 11 वर्षीय मुलगा सर्व रा.डालडा मील, 17 वर्षीय मुलगा रा.राणीपुरा, 25 वर्षीय पुरुष आणि 50 वर्षीय पुरुष दोघे रा.दाभरी, तर शिरपूर शहरातील 30 वर्षीय पुरुष, 47 वर्षीय पुरुष, 25 वर्षीय पुरुष, 21 वर्षीय महिला सर्व रा.गोविंद नगर, 36 वर्षीय महिला, 36 वर्षीय पुरुष, 17 वर्षीय मुलगा सर्व रा.बौध्दवाडा खालचे गाव, 7 वर्षीय मुलगी, 16 वर्षीय मुलगा दोघ रा.अंबिका नगर, 22 वर्षीय महिला रा.के.जी. रोड या रूग्णांचा समावेश आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com