Friday, April 26, 2024
Homeनाशिकनाशिक जिल्ह्यात करोना मुक्तीचे प्रमाण ६९ टक्के; सध्या पॉझिटिव्ह रूग्णसंख्या ३५८ वर

नाशिक जिल्ह्यात करोना मुक्तीचे प्रमाण ६९ टक्के; सध्या पॉझिटिव्ह रूग्णसंख्या ३५८ वर

नाशिक ।  प्रतिनिधी

नाशिक जिल्ह्यात करोनाची सुरूवात झाल्यापासून  आतापर्यंत एकुण करोना पॉझिटिव्ह येणारांचा आकडा 1172 असला तरी दुसर्‍या बाजुला करोना मुक्त होणारांचे प्रमाण 69.45 टक्के इतके चांगले आहे. आतापर्यंत जिल्ह्यातून 814 रूग्णांनी करोनावर मात केली आहे. तर आतापर्यंत 9 हजार 698 नागरीकांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. हा मोठा दिलासा जिल्हा तसेच आरोग्य प्रशासनास आहे.

- Advertisement -

मालेगावपाठोपाठ नाशिक शहरात करोनाचा प्रसार वेगात होत सुरू झाला आहे. आज दिवसभरात जिल्ह्यातील 9 रूग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तर आज जिल्ह्याभरात नव्याने 28 पॉझिटिव्ह रूग्णांनी करोनावर मात केली आहे. करोनाचा हॉटस्पॉट ठरलेल्या मालेगाव शहरात करोना मुक्त होण्याचा वेगही सर्वाधिक असून तेथील सर्वाधिक 78.95 टक्के, 604 रूग्ण करोना मुक्त झाले आहेत.

यानंतर मालेगाव खालोखाल ग्रामिण जिल्ह्यातही हे प्रमाण 78.18 टक्के आहे. नाशिक महापालिका हद्दीत करोनाम मुक्त होणारांचे प्रमाण 33.33 टक्के इतके आहे. महापालिका हद्दीत आतापर्यंत 183 पैकी 61 रूग्ण पुर्ण बरे झाले आहेत.

दरम्यान, मालेगावनंतर नाशिक शहरात रूग्ण संख्या झपाट्याने वाढत आहे. आज दिवसभरात 9 रूग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यात नाशिक शहरातील 4 जणांचा सामावेश असल्याने शहरातील करोना रूग्णांची आकडे वारी 183 वर पोहचली आहे. ग्रामिण भागातील 3 तर जिल्हा बाह्य 2 रूग्णांचा सामावेश आहे.

यामुळे जिल्ह्यात आतापर्यंत करोना ग्रस्तांची संख्या 1172 वर पोहचली आहे. तर आज एका रूग्णांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात आज नव्याने 137 करोना संशयित रूग्ण दाखल झाले आहेत. यात नाशिक शहरातील 57, जिल्हा रूग्णालय 6, ग्रामिण 50, मालेगाव 22 संशयित रूग्णांचा सामावेश आहे.

दरम्यान, जिल्ह्यात आजपर्यंत 11 हजार 503 स्वॅब तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. यातील 9 हजार 698 निगेटिव्ह आले आहेत, 1172 पॉझिटिव्ह आले आहेत. यातील 297 रूग्ण उपचार घेत आहेत. तर अद्याप 633 अहवाल प्रलबिंत आहेत. अहवाल प्रलंबित राहण्याच्या प्रमाण वाढले असल्याने चिंता व्यक्त होत आहे. यामुळे मागील काही दिवसांचे अहवाल एकत्र आल्यानंतर एकदम करोनाग्रस्तांचा आकडा वढलेला दिसतो असे रूग्णालय प्रशासनाने स्पष्ट केले.

- Advertisment -

ताज्या बातम्या