Friday, April 26, 2024
Homeनाशिकदिवसभरात ६४ करोना पॉझिटिव्ह; नाशिक शहरात ३९, मनमाडमध्ये ९ तर मालेगावात...

दिवसभरात ६४ करोना पॉझिटिव्ह; नाशिक शहरात ३९, मनमाडमध्ये ९ तर मालेगावात ६ बाधित

नाशिक | प्रतिनिधी 

नाशिक जिल्ह्यात आज दिवसभरात ६४ करोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे जिल्ह्यातील रुग्णसंख्या आता १८२२ वर पोहोचली आहे. तर एकट्या नाशिक शहरात आज दिवसभरात ३९ रुग्णांची भर पडली असून रुग्णसंख्या ३२७ वर पोहोचली आहे.

- Advertisement -

आज नाशिक शहरासह जिल्ह्यातील मालेगावात ६, तर मनमाडमध्ये ९ रुग्ण वाढले आहेत. तसेच बागलाण तालुक्यात आज दोन रुग्ण वाढले असून जायखेडा आणि सटाणा येथील रुग्णांचा समावेश आहे.

आज रात्रीपर्यंत जिल्हा प्रशासनास प्राप्त अहवालानुसार जिल्ह्याभरात नव्याने ६४ रूग्णांची भर पडली. यामध्ये एकट्या नाशिक शहरात ३९ अहवाल आहेत. यात पंचवटी 5, सुभाषरोड, 4, जुने नाशकातील बागवानपुरा 3, कथडा 1, अझाद चौक 2,मायको दवाखाना1, कमोदरोड1, पाथर्डीफाटा 2, पेठरोड 3, जाचकमळा, नाशिकरोड 2, द्वारका 1 येथील रूग्णांचा सामावेश आहे. यामुळे नाशिकशहराचा आकडा 571 वर पोहचला आहे.

ग्रामिण भागातील 19 रूग्ण आढळले आहेत. यामध्ये मनामड 8, येवला2, पिंपळगाव बसवंत 2, मडसांगवी 1, ईगतपुरी 2, 1, मोखाडा 1, भोरी कॅम्प 1 या रूग्णांचा सामावेश आहे. यामुळे ग्रामिण भागातील रूग्णांचा आकडा 306 झाला आहे.

तर मालेगावात 4 रूग्ण आढळले असून मालेगावचा आकडा 871 वर गेला आहे. करोनामुळे आज 6 जणांचा मत्यू झाला. यामध्ये नाशिक शहरातील वडाळानाका येथील रेणुकानगर 1, येथीलच काळेचौक येथील1 व एका रूग्णाचा आहे यामुळे मृत्यूचा आकडा 115 झाला आहे. तसेच जिल्ह्यात आज 49 रूग्ण करोना मुक्त झाले असून बरे होणारांचा आकडा 1201 वर पोहचला आहे.

दरम्यान जिल्ह्यात आजपर्यंत 14 हजार 562 स्वॅब तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. यातील 12 हजार 453 निगेटिव्ह आले आहेत, 1816 पॉझिटिव्ह आले आहेत. यातील 474 पॉझिटिव्ह रूग्ण घेत आहेत. तर अद्याप 319 अहवाल प्रलबिंत आहेत. दरम्यान आज नव्याने 169 संशयित रूग्ण दाखल झाले आहेत. यात नाशिक शहरातील 97, जिल्हा रूग्णालय 11, ग्रामिण 29, मालेगाव 9 संशयित रूग्णांचा सामावेश आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या