बापरे! ६० टक्‍के पुणेकरांना मधुमेहामुळे हार्ट फेल्युअरचा त्रास
स्थानिक बातम्या

बापरे! ६० टक्‍के पुणेकरांना मधुमेहामुळे हार्ट फेल्युअरचा त्रास

Dinesh Sonawane

Dinesh Sonawane

६० टक्‍के हार्ट फेल्युअर रूग्‍ण पूर्वीपासूनच अनियंत्रित मधुमेहाने पीडित

एकूण रूग्‍णांपैकी ४० टक्‍क्‍यांहून अधिक महिलांना हार्ट फेल्युअरचा त्रास

अनियंत्रित मधुमेह किंवा रक्‍तातील साखरेची पातळी हे पुण्‍यातील रूग्‍णांमध्‍ये असलेल्‍या हार्ट फेल्युअरचे (एचएफ) प्रमुख कारण म्‍हणून निदर्शनास आले आहे. पुण्‍यातील जवळपास ६० टक्‍के रूग्‍ण दीर्घकाळापासून अनियंत्रित मधुमेहामुळे हार्ट फेल्युअरने पीडित आहेत.  याव्‍यतिरिक्‍त असे निदर्शनास आले आहे की, पुरूषांप्रमाणेच महिलांना देखील एचएफ होण्‍याचा तितकाच धोका आहे. अंदाजे ४० टक्‍के हार्ट फेल्युअर रूग्‍ण महिला आहेत.

इंटरनॅशनल डायबिटीज फेडरेशनच्‍या अहवालात हि माहिती समोर आली आहे. भारतात ७२ दशलक्ष मधुमेही रूग्‍ण आहेत. ज्‍यामुळे भारत देश डायबिटीज कॅपिटल ऑफ वर्ल्‍ड बनला आहे. हृदयविषयक आजार हे मधुमेहाने पीडित व्‍यक्‍तींच्‍या अकाली मृत्‍यूसाठी प्रमुख कारण ठरत आहेत.

हार्ट फेल्‍युअर हे सर्व सीव्‍हीडींमध्‍ये मृत्‍यू व वारंवार हॉस्पिटलमध्‍ये भरती होण्‍यासाठी प्रमुख कारण आहे. हार्ट फेल्युअरमुळे होणा-या मृत्‍यूचे प्रमाण कर्करोगामुळे होणा-या मृत्‍यूच्‍या प्रमाणापेक्षा कमी आहे. ३ पैकी एका हार्ट फेल्युअर रूग्‍णाचा निदानाच्‍या १ वर्षामध्‍येच त्‍यांच्‍या उत्‍पादक वयादरम्‍यान मृत्‍यू होत आहे.

भारतातील तरूण व्‍यक्‍तींमध्‍ये हृदयविषयक आजारांमध्‍ये वाढ झाली आहे आणि यासाठी कारणीभूत घटक म्‍हणजे मधुमेह. म्‍हणून लक्षणे ओळखून त्‍यानुसार उपचार करण्‍यासाठी आणि त्‍यांना सामान्‍य जीवन जगण्‍यामध्‍ये मदत करण्‍यासाठी विशेषीकृत सीव्‍हीडी केंद्रे उभारणे ही काळाची गरज बनली आहे.  कोणीही या लक्षणांबाबत गोंधळून जाऊ नये किंवा त्‍याकडे दुर्लक्ष करू नये. डॉक्‍टरांनी सांगितलेल्‍या सल्‍ल्‍यानुसार औषधोपचार व जीवनशैलीमधील बदलांचे पालन करावे.

डॉ. शिरी हिरेमथ, कार्डियोलॉजिकल सोसायटी ऑफ इंडियाचे (सीएसआय) माजी अध्‍यक्ष

हार्ट फेल्‍युअर हे सर्व सीव्‍हीडींमध्‍ये मृत्‍यू व वारंवार हॉस्पिटलमध्‍ये भरती होण्‍यासाठी प्रमुख कारण आहे. वाढत्‍या प्रमाणामुळे सामाजिक आर्थिक भार वाढण्‍यासोबतच भावनिक परिणाम देखील दिसून येतात. म्‍हणूनच मधुमेह, गतकाळातील हृदयविषयक आजार, उच्‍च रक्‍तदाब अशा धोकादायक घटकांवर बारकाईने लक्ष ठेवण्‍यासोबत मद्यपान टाळणे, मीठाच्‍या सेवनावर नियंत्रण ठेवणे आणि आरोग्‍यदायी आहार सेवन करणे अशा जीवनशैली बदलांचा अवलंब करणे आवश्‍यक आहे.

डॉ. गौरव गणेशवाला, इंटरवेन्‍शनल कार्डियोलॉजिस्‍ट 

मधुमेह व हार्ट फेल्युअरमधील संबंध

टाइप २ मधुमेह व हार्ट फेल्युअर (एचएफ) यांच्‍यामध्‍ये सामान्‍यपणे संबंध आहे. २५ टक्‍के मधुमेहाने पीडित रूग्‍णांना तीव्र हार्ट फेल्युअरचा त्रास आहे आणि त्‍यापैकी हॉस्पिटलमध्‍ये भरती करण्‍यात आलेल्‍या ४० टक्‍के रूग्‍णांना अॅक्‍युट हार्ट फेल्युअरचा (गंभीर स्थिती) त्रास आहे. मधुमेह असलेल्‍या हार्ट फेल्युअरने पीडित रूग्‍णांचे हॉस्पिटलमधील प्रमाण मधुमेह नसलेल्‍या रूग्‍णांच्‍या तुलनेत वाढले आहे 

दुसरीकडे अनेक अभ्‍यासांमधून निदर्शनास आले आहे की, मधुमेह कार्डिओमायोपथीमुळे मधुमेह हार्ट फेल्युअर होण्‍याचा धोका वाढवतो. मधुमेह कार्डिओमायोपथी हा मधुमेहाने पीडित रूग्‍णांमधील हृदयाच्‍या स्‍नायूचा एक आजार आहे. यामुळे संपूर्ण शरीराला रक्‍तपुरवठा करण्‍याच्‍या हृदयाच्‍या कार्यामध्‍ये अड‍थळा निर्माण होतो.

  • पायाचा घोटा, पाय व पोटाला सूज येणे
  • सतत थकवा येणे
  • श्‍वास घेण्‍यामध्‍ये त्रास होणे
  • अनियंत्रित ग्‍लुकोज पातळी
Deshdoot
www.deshdoot.com