Friday, April 26, 2024
HomeUncategorizedनंदुरबार : जिल्ह्यात 6 जण करोनामुक्त

नंदुरबार : जिल्ह्यात 6 जण करोनामुक्त

नंदुरबार –

नंदुरबार जिल्ह्यात आज पुन्हा सहा जण कोरोनामुक्त झाले आहेत. यात शहाद्याच्या पाच तर अक्कलकुवा येथील एका रुग्णाचा समावेश आहे. त्यामुळे आता जिल्ह्यात फक्त चार रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आज सायंकाळी कोरोनामुक्त सहा जणाना जिल्हा रुग्णालयातून सोडण्यात आले.

- Advertisement -

जिल्ह्यात गेल्या महिनाभरात 21 जण कोरोनाबाधीत आढळून आले होते. यापैकी दोघांचा मृत्यू झाला होता. तर 19 जणांवर उपचार सुरू होते. याआधी पाच व त्यानंतर चार जण असे नऊ रुग्ण कोरोनामुक्त झाले होते. त्यामुळे उपचार सुरु असलेल्या रुग्णांची संख्या 9 होती. यातील आणखी 6 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यांना आज सायंकाळी जिल्हा रूग्णालयातून सुटी देण्यात आली.

त्यामुळे कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या 15 झाली आहे. सद्य:स्थितीत आता जिल्हा रूग्णालयात 4 जणांवर उपचार सुरू आहेत. आज सुटी देण्यात आलेल्या सहा जणांमध्ये अक्कलकुवा येथील एक 56 वर्षीय पुरूष तर शहाद्यातील एक 12 वर्षीय मुलगी, 17 वर्षीय युवती, 40,44 व 48 वर्षीय इसमांचा समावेश आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत एक हजार संशयितांचे स्वॅबचे नमुने घेण्यात आले आहेत. त्यापैकी 21 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले होते. 829 जणांचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत. 146 जणांचे अहवाल प्रलंबित आहेत.

नाशिक येथे एका आजाराचे उपचार सुरु असलेल्या बामखेडा (ता.शहादा) येथील रुग्णाचा कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. त्यामुळे बामखेडा येथील त्याच्या घरातील 8 सदस्याना क्वारंटाईन करण्यात आले आहे. दरम्यान, संबंधित रुग्णाच्या घराचा परिसर सिल करण्यात आला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या