नाशिक जिल्ह्यात नव्याने ५७ करोना पॉझिटिव्ह रूग्णांची भर; जिल्ह्याचा आकडा १०५८ वर
स्थानिक बातम्या

नाशिक जिल्ह्यात नव्याने ५७ करोना पॉझिटिव्ह रूग्णांची भर; जिल्ह्याचा आकडा १०५८ वर

Dinesh Sonawane

Dinesh Sonawane

नाशिक | प्रतिनिधी

मालेगाव, नाशिक शहरासह जिल्ह्याच्या ग्रामिण भागात करोनाचा उद्रेक सुरू झाला आहे. आज जिल्ह्याभरात नव्याने ५७ रूग्णांची भर पडली. यात ग्रामिण भागातील २२, नाशिक शहरातील १० तर मालेगावच्या २० रूग्णांचा सामावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत करोना ग्रस्तांची संख्या १०५८ वर पोहचली आहे. तर आज दोन रूग्णांचा मृत्यू झाला आहे.

आज दिवसभरात जिल्ह्यातील २४५ अहवाल जिल्हा प्रशासनास प्राप्त झाले. यात १७६ निगेटिव्ह तर ५७ पॉझिटिव्ह आढळले.यात नाशिक शहरातील मार्केट यार्ड येथील २, राहुलवाडी १, नाशिकरोडच्या दत्तमंदिर चौक २, आयटीपार्क वडाळा १, रासबिहारी स्कुल रोड १, वडाळा नाका १, नांदुरनाका १, दिपालीनगर १असे रूग्ण आहेत. यामुळे नाशिकशहराचा आकडा १३८ वर पोहचला आहे.

ग्रामिण भागातील आज २२ रूग्ण आढळून आले आहेत. सिन्नर तालुक्यातील दापुर ५, सिन्नर १, वावी १, निमगाव १ असे ८ रूग्ण आढळले आहेत. येवला तालुक्यातील मुलतानपुरा ४, मुखेड २ असे ६ रूग्ण आढळले आहेत, सटाणा२, सैंदाणे २ यांचा सामावेश आहे. यामुळे ग्रामिण भागातील रूग्णांचा आकडा १५६ झाला आहे. तर मालेगाव शहरातील २५ रूग्ण पॉझिटिव्ह आले असून यात ३ रेल्वे पोलीस व १ सटाणा येथील पोलीसाचा सामावेश आहे.

जिल्ह्यात २ जांचा मृत्यू झाला असून एकुण मृत्यू झालेल्यांचा आकडा ६० झाला आहे. तसेच आज दिवसभरात ४ करोनाग्रस्त रूग्ण करोनामुक्त झाले असून त्यांना रूग्णालयातून मुक्त करण्यात आले आहे. यामुळे करोना मुक्त होणारांचा आकडा ७३९ वर पोहचला आहे.

दरम्यान, जिल्ह्यात आजपर्यंत ४५ हजार ३८३ संशयित रूग्णांचे स्क्रीनींग करण्यात आले आहे. जिल्ह्यातून आजपर्यंत १० हजार ६२४ स्वॅब तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. यातील ९ हजार १२५ निगेटिव्ह, १०५७ पॉझिटिव्ह आले आहेत. यातील २५४ रूग्ण उपचार घेत आहेत. तर अद्याप ४९६ अहवाल प्रलबिंत आहेत. तर आज नव्याने ११२ संशयित रूग्ण दाखल झाले आहेत. यात नाशिक शहरातील ८५, जिल्हा रूग्णालय ३, ग्रामिण ४, मालेगाव २० संशयित रूग्णांचा सामावेश आहे.

जिल्हा प्रशासनाच्या अहवालानुसार
* एकूण कोरोना बाधित: १०५८
* मालेगाव : ७१५
* नाशिक : १३८
* उर्वरित जिल्हा : १५६
* जिल्हा बाह्य ः ४८
* एकूण मृत्यू: ६०
* कोरोनमुक्त : ७३९

Deshdoot
www.deshdoot.com