५० टक्के पॉवरलूम उद्योग १ जूनपासून सुरु होणार; प्रतिबंधित क्षेत्रात निर्बंध कायम
स्थानिक बातम्या

५० टक्के पॉवरलूम उद्योग १ जूनपासून सुरु होणार; प्रतिबंधित क्षेत्रात निर्बंध कायम

Dinesh Sonawane

Dinesh Sonawane

नाशिक । प्रतिनिधी

मालेगावमधील कंटेनमेंट झोन वगळता शहरातील ५० टक्के पॉवरल्यूम उद्योग येत्या १ जूनपासून सुरू करण्यात येतील. करोनाचा फैलाव होऊ नये यासाठी सुरक्षेचे नियम पाळणे बंधनकारक असेल, असे जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी सांगितले.

मालेगाव करोनाचे हाॅटस्पाॅट ठरल्यसने मागील दीड महिन्यापासून पाॅवरल्यूम उद्योग बंद आहे. पण आता कंटेनमेंट झोन बाहेरील पॉवरल्यूम सुरु करण्यास परवानगी दिली आहे.

त्यामुळे मजूरांच्या हातालाही काम मिळेल. तसेच पॉवरलुम चालकांच्या अडचणी सोडविण्याकरीता जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली पॉवरल्यूम चालक, मालक यांची समितीही गत पंधरवाड्यातच गठीत करण्यात आली आहे.

या समितीमार्फत पॉवरलूम बाबत निर्णय घेतले जाणार असल्याचे जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी सांगितले. तसेच पॉवरलूम चालकांची गुरूवारी (दि.२८) बैठक आयोजित करण्यात आली, असून या बैठकीत पॉवरलूम सुरू करण्याबाबतचे नियोजन करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

४५ कंटेंटमेंट झोन उद्योग सुरु करण्यासाठी प्रयत्न

११९ कंटेन्मटमेंट झोन तयार करण्यात आले होते. त्यामुळे तेथील सर्वच उद्योग, व्यावसाय बंद झाले होते. याचा परिणाम पॉवरल्यूम उद्योगांवरही झाला होता. तीनबलाखावरील उद्योग बंद पडल्याने साडेतीन लाख मजूरांच्या जेवणाचा प्रश्न निर्माण झाला होता. पण रुग्ण संख्या वाढण्याबरोबरच बरे होण्याचेही प्रमाण वाढले आहे. आता उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या शंभराच्या आता आली तर कंटेनमेंट झोनही ११९ वरून ४५ पर्यंत मर्यादित करण्यात आले. तर शासनानेही पॉवरल्यूम सुरु करण्यास राज्यात परवानगी यापुर्वीच दिली आहे. त्यामुळे पॉवरल्यूम सुरु करण्याची मागणी होऊ लागली आहे. त्याची दखल घेत जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समीती गठीत झाली असून ही समीती आता पॉवरल्यूम सुरु करण्याचे नियोजन करत असल्याचे जिल्हाधिकारी मांढरे यांनी सांगितले.

पासद्वारे कामगारांना परवानगी

शासन निर्देशानूसार पॉवरलूम सुरू करण्यासाठी मालेगावसाठी विशेष सवलत दिली आहे. पण केवळ कंटेनमेंट झोन बाहेरचेच पॉवरलूम सुरू होउ शकतील. आणि कंटेनमेंट झोनच्या बाहेरचेच लोक तेथे काम करू शकतील. कामगारांना पासेस दिले जातील. यंत्रमागधारकांच्या अडचणी सोडविण्यासाठी अपर जिल्हाधिकारी, महापालिका उपायुक्त, कामगार उपायुक्त, आणि पोलीस अधिकारी यांची एक समिती गठित करण्यात आली असून या समितीमार्फत पावरलूमला परवानगी देण्यात येईल. याबाबत गुरूवारी बैठक घेण्यात येणार आहे.

– सूरज मांढरे, जिल्हाधिकारी

Deshdoot
www.deshdoot.com