Friday, April 26, 2024
Homeनाशिकमालेगावमध्ये करोनाचा कहर सुरूच; दिवसभरात ४८ अहवाल ‘पॉझिटिव्ह’

मालेगावमध्ये करोनाचा कहर सुरूच; दिवसभरात ४८ अहवाल ‘पॉझिटिव्ह’

मालेगाव | प्रतिनिधी 

मालेगावमध्ये करोनाचा कहर सुरूच आहे. आज सकाळी ३६ अहवाल बाधित आढळून आल्यानंतर सायंकाळी पुन्हा १२ रुग्णांचे अहवाल बाधित आढळून आले आहेत. त्यामुळे मालेगाव शहरात आज दिवसभरात ४८ अहवाल बाधित आढळून आले आहेत. यामध्ये चार रुग्णांची दुसरी चाचणी बाधित सिद्ध झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

- Advertisement -

आज दुपारी जिल्हा रुग्णालयाकडे मालेगावमधील नमुन्यांचे ११४ अहवाल प्राप्त झाले. यात १०२ अहवाल निगेटिव्ह आले असून १२ अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.

त्यामुळे एकट्या मालेगावातील करोनाबाधितांची संख्या १७१ झाली असून, जिल्ह्यातील करोना बाधितांचा आकडा १९३ वर पोहोचला आहे. दुर्दैवाची बाब म्हणजे, पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये दोन पोलिसांचादेखील समावेश असल्याचे समजते. दोघेही पोलीस रेड झोनमध्ये बंदोबस्तावर होते अशी प्राथमिक माहिती मिळते आहे.

आज मालेगाव शहरात आढळून आलेले रुग्ण या परिसरातील आहेत

आज बाधित आढळून आलेली ४५ वर्षीय आणि ४० वर्षीय व्यक्ती शहरातील कुसुंबा परिसरातील आहेत. सोयगावमधील आनंदनगर येथील एका ४० वर्षीय व्यक्तीला करोनाची लागण झाली आहे. २१ वर्षीय चुनाभट्टी परिसरातील तरुणाचा अहवाल बाधित आला आहे. ५१ वर्षीय एका प्रौढाचा अहवाल बाधित आला   आला असून ही व्यक्ती कुठली आहे ते समजू शकले नाही.  ४४ वर्षीय महिला व २१ वर्षीय तरुण एकता नगर परिसरातील आहेत. ५१ वर्षीय व्यक्ती सलीम मुन्शी नगर परिसरातील आहे. इस्लामपुरा परिसरातील ६७ वर्षीय वृद्ध आणि ४४ वर्षीय व्यक्तीचा अहवाल बाधित आढळून आला आहे.  ५४ वर्षीय दोन महिला बाधित आढळून आल्या असून एक कुंभारवाड्यातील तर दुसरी बेलबाग परिसरातील असल्याचे समजते. १२ वर्षीय बालिकेला  देखील करोनाची बाधा झाली असून ती बद्र का  बाडा परिसरातील असलायचे समजते.

नाशिक जिल्ह्यातील स्थिती 

नाशिक मनपा

११ रुग्ण बाधित
दोघे बरे झाले

नाशिक ग्रामीण
११ रुग्ण बाधित
दोघे बरे झाले

मालेगाव मनपा

१७१ बाधित रुग्ण
०७ बरे झाले
१२ दगावले

नाशिक जिल्ह्यातील एकूण बाधित १९३

आज मालेगाव मधील जवळपास १५० हून अधिक अहवाल आपल्याला प्राप्त झालेले आहेत. हे सर्व स्वब वेगवेगळ्या दिवशी घेतले होते परंतु किट्स अभावी त्याबद्दलचे अहवाल प्राप्त होत नव्हते. आता आपण किटस पाठवल्यानंतर हे अहवाल तातडीने प्राप्त होत आहेत. जरी पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या खूप जास्त दिसत असली तरी ती एका दिवशी एकदम पॉझिटिव्ह आलेले रुग्ण नसून आतापर्यंत साठलेल्या वेगवेगळ्या दिनांकाचे ते रुग्ण आहेत. त्यामुळे एकंदरीत पहिला रुग्ण आढळून आल्या पासून आतापर्यंत ठराविक गतीने दररोज रुग्ण वाढत आहेत. अद्यापही बहुतांश रुग्ण हे मूळ रुग्णाच्या सहवासात आलेलेच व्यक्ती आहेत व ते यापूर्वी आपण क्वारांटाईन केलेले आहेत.

सूरज मांढरे, जिल्हाधिकारी नाशिक

- Advertisment -

ताज्या बातम्या