पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांसाठी लवकरच ४४८ सदनिकांचे बांधकाम; मुख्यमंत्र्याच्या हस्ते आज उद्घाटन
स्थानिक बातम्या

पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांसाठी लवकरच ४४८ सदनिकांचे बांधकाम; मुख्यमंत्र्याच्या हस्ते आज उद्घाटन

Dinesh Sonawane

Dinesh Sonawane

मुंबई : महाराष्ट्र राज्य पोलीस गृहनिर्माण व कल्याण महामंडळाच्यावतीने मुंबई पोलीस दलातील अधिकारी, कर्मचारी यांच्यासाठी बांधण्यात येणाऱ्या निवासस्थानाच्या प्रकल्पाचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या हस्ते भुमीपूजन करण्यात आले.

या प्रकल्पात प्रशासकीय इमारत, विश्रांतीगृह, वसतीगृह, क्रिडासंकुल यांच्यासह सर्व सुविधायुक्त ४४८ सदनिकांचे बांधकाम करण्यात येणार आहे.

यासाठी तळमजल्यासह सात मजल्यांच्या सोळा इमारती उभारण्यात येणार आहेत. त्यासाठी सुमारे २२५ कोटी १३ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. यावेळी पोलीस महासंचालक (गृहनिर्माण) बिपिन बिहारी यांनी स्वागत केले व प्रकल्पाची माहिती दिली.

Deshdoot
www.deshdoot.com