नाशिकमध्ये ४४६ कंपन्या, ५ हजार औद्योगिक आस्थापना सुरु; ६० हजार कर्मचारी व मजूर कामावर

नाशिकमध्ये ४४६ कंपन्या, ५ हजार औद्योगिक आस्थापना सुरु; ६० हजार कर्मचारी व मजूर कामावर

नाशिक । प्रतिनिधी

जिल्ह्यात इमर्जन्सी ऑपरेशन सेंटरच्या माध्यमातून अत्यावश्यक उद्योग व व्यवसायांना चालना देण्याचा प्रयत्न सुरू आहे. औद्योगिक विकास महामंडळाच्या प्रादेशिक कार्यालयाच्या माध्यमातून आजपर्यंत ४४६ कंपन्यांना सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. तसेच जिल्हा उद्योग केंद्राच्या माध्यमातून पाच हजार औद्योगिक आस्थापना सुरू असून ६० हजार कर्मचारी व मजूर सध्या त्यात काम करत असल्याची माहिती जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी दिली.

लॉकडाउनच्या काळात अत्यावश्यक उद्योगधंदे सुरू ठेवण्यासाठी ऑनलाईन प्राप्त अर्जांवर औद्योगिक विकास महामंडळाच्या प्रादेशिक कार्यालयामार्फत ४४६ कंपन्या सुरू ठेवण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. त्यात फार्मा निर्मिती क्षेत्रातील ७५ जीवनावश्यक वस्तुंच्या निर्मिती करणाऱ्या १४१, आयटी क्षेत्रातील १९, पॅकेजींग मटेरीयल्स, अत्यावश्यक सेवा पुरवठा करणाऱ्या २११ कंपन्यांचा समावेश आहे.

या कंपन्या सुरु करताना लोकांच्या अत्यावश्यक तसेच गरजा लक्षात घेवून खरोखरच ज्या कंपन्या सुरू करणे आवश्यक आहेत अशाच कंपन्यांना परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे, अत्यावश्यक नसलेल्या २३० कंपन्यांना परवानगी नाकारण्यात आली आहे. तसेच लहान मोठ्या व्यावसायीक व औद्योगिक आस्थापनांच्या माध्यमातून नागरिकांचे जनजीवन सुरळीत चालेल व सोशल डिस्टन्सीचे तंतोतंत पालन करताना कर्मचारी, मजूर यांच्या रोजगाराचा विचार करून जिल्हा उद्योग केंद्राच्या माध्यामातून ऑनलाईन प्रणालीद्वारे ७ हजार ५५० आस्थापनांना परवानगी देण्यात आली आहे.

त्यापैकी ६ हजार ६०० आस्थापनांची माहिती संकलीत करण्यात आली आहे, व त्यातील पाच हजार औद्योगिक आस्थापना सुरू झाल्या असून त्यात ६० हजार कर्मचारी व मजुर कामावर उपस्थित अाहेत.

कृषी क्षेत्राला चालना

कृषी क्षेत्रातील व्यवहारांवर जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी यांच्या माध्यमातून समन्वय ठेवला जात आहे. त्यामुळे ग्रामीण अर्थचक्र तर सुरू राहुन लॉकडाउनच्या काळात नागरीकांना दैनंदिन भाजीपाला, अन्नधान्य पुरविण्यासाठी चांगलाच हातभार लागला आहे. तसेच एका दिवसातत ४.६७ लाख लिटर दुधाचे संकलन करण्यात येत असून त्यापैकी शहरात २.२१ लाख लिटर दुधाची विक्री करण्यात आली आहे.

शेतीसाठी आवश्यक बाबींसाठी किटकनाशके, खते, बियाणे यांची प्रत्येकी ५९१ केंद्र सुरू असून द्राक्ष निर्यातदार व पॅक हाऊसची चार युनिट कार्यान्वित करण्यात आली आहेत. जिल्ह्यातील १७ बाजार समित्यांपैकी ९ बाजार समित्यांमध्ये शेतमालाचे लिलाव करण्यात आले आहेत. त्यातील ८ बाजार समित्यांमध्ये कांदा लिलाव झाले असून या लिलावाच्या वेळी बाजार समित्यात ५० हजार ६२५ क्विंटल कांद्याची आवक झाली आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com