Voting Clipart
Voting Clipart
स्थानिक बातम्या

गोवर्धन गटासाठी 43.22 तर खेडगावसाठी 45.17 टक्के मतदान; आज होणार मतमोजणी

Gaurav Pardeshi

Gaurav Pardeshi

नाशिक / दिडोरी । प्रतिनिधी

जिल्हा परिषदेच्या दोन गटासाठी गुरुवारी (दि.12) झालेल्या मतदानात गोवर्धन (ता. नाशिक) गटासाठी 43.22 टक्के तर खेडगाव (ता. दिंडोरी) गटासाठी 45.17 टक्के मतदान झाले. उद्या शुक्रवारी (दि.13) दोन्ही गटाची मतमोजणी होणार आहे. कळवण तालुक्यातील मानूर गटात गिताजंली पवार यांची बिनविरोध निवड झाली आहे.

गोवर्धन गटात मतदानाची टक्केवारी गेल्या वर्षीच्या तुलनेत घटली आहे. मतदानासाठी मतदारांचा कोणत्याही मतदान केंद्रावर उत्साह दिसून आला नाही. अनेक मतदार केंद्रावर मतदारांची नावे नसल्याच्या तक्रारी होत्या. सायंकाळी 5.30 वाजेपर्यंत गोवर्धन गटासाठी 43.22 टक्के मतदान झाले.

या गटात राष्ट्रवादीचे प्रभाकर गुंबाडे, शिवसेनेचे राज चारस्कर, भाजपचे दौलत ससाणे व अपक्ष तुषार डहाळे रिंगणात आहे. चार उमेदवार रिंगणात असले तरी शिवसेना विरूध्द राष्ट्रवादी अशीच लढत झाली. खेडगाव गटासाठी दिवसभरात 45.17 टक्के मतदान झाले. या गटात अपक्ष भास्कर भगरे व अपक्ष विजय वाघ यांच्यात लढत झाली. गोवर्धन गटाची मतमोजणी नाशिक तहसील कार्यालयात सकाळी 10 वाजता तर, खेडगाव गटाची मतमोजणी दडोरी तहसील कार्यालयात होईल.

Deshdoot
www.deshdoot.com