धोका वाढला ; धुळ्यात ४१० करोनाबाधित
स्थानिक बातम्या

धोका वाढला ; धुळ्यात ४१० करोनाबाधित

Balvant Gaikwad

जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढत असून जिल्ह्यात बाधितांची संख्या 410 वर पोहचली आहे. धुळे शहर व शिरपूरात सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहेत. दरम्यान, अल्पवयीन मुलगी, जळगाव येथील पुरुष यांचा हिरे रुग्णालयात मृत्यू झाला.

19 बाधित आढळले

आज भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील 37 अहवालांपैकी 16 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यात धुळे शहरात सात रुग्ण आढळले. 70 वर्षीय पुरुष मोहमदीयानगर, 60 वर्षीय पुरुष शिवाजीनगर, 58 वर्षीय महिला ग.नं.5, 14 वर्षीय बालक ग.नं.7, 33 वर्षीय महिला ग.नं.7, 52 वर्षीय पुरुष मोगलाई आणि 60 वर्षीय महिला यांचा समावेश आहे.

धुळे तालुक्यातील फागणे येथे 40 वर्षीय पुरुष आणि 35 वर्षीय महिला तर नेर येथे 32 वर्षीय पुरुष कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. तर शिरपूर शहरातील सहा रुग्णांचा समावेश आहे. तसेच शिरपूर उपजिल्हा रुग्णालय येथील आठ अहवालांपैकी एक अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यात 45 वर्षीय पुरुष गोविंदनगर याचा समावेश आहे. दोंडाईचा उपजिल्हा रुग्णालय येथील 22 अहवालांपैकी दोन अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यात 68 वर्षीय महिला राणीपुरा आणि 11 वर्षीय मुलगी राणीपुरा यांचा समावेश आहे.

काल 13 अहवाल पॉझिटिव्ह

काल दि. 13 जूनच्या रात्री शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील 53 अहवालांपैकी 13 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यात धुळे शहरातील सात रुग्णांचा समावेश आहे. 50 वर्षीय महिला गजानन कॉलनी, 41 वर्षीय पुरुष मोहमदीयानगर, 75 वर्षीय महिला ग.नं.7, 60 वर्षीय महिला सुभाषनगर, 37 वर्षीय महिला ऐंशीफूटी रोड, 40 वर्षीय पुरुष आणि 63 वर्षीय महिलेचा समावेश आहे. तर धुळे तालुक्यातील वडणे आणि नेर येथे प्रत्येकी एक, शिरपूर दोन, दोंडाईचा आणि पिंपळनेर येथे प्रत्येकी एक रुग्ण आढळून आला आहे.

जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या 410 वर पोहचली आहे. तर 203 जणांना उपचारानंतर सुटी देण्यात आली आहे. धुळे शहरातील अल्पवयीन मुलगी, जळगाव येथील पुरुष यांचा हिरे वैद्यकीय रुग्णालयात मृत्यू झाला आहे. तर अन्य एक संशयित रुग्णाचाही मृत्यू झाला आहे. परंतू त्याची कोरोना टेस्ट रिपोर्ट पेंडींग आहे. जिल्ह्यात 36 जणांचा मृत्यू झाला.

Deshdoot
www.deshdoot.com