चांदवडमधील सात वर्षीय बालिका करोना पॉझिटिव्ह; आज नव्याने जिल्ह्यात ३८ रूग्णांची भर; करोनाबाधितांचा आकडा ८३८ वर

चांदवडमधील सात वर्षीय बालिका करोना पॉझिटिव्ह; आज नव्याने जिल्ह्यात ३८ रूग्णांची भर; करोनाबाधितांचा आकडा ८३८ वर

नाशिक ।  प्रतिनिधी

जिल्ह्यात करोग्रस्तांचा आकडा कमी होत असतानाच आज दिवसभरात अचानक 38 रूग्णांची भर पडली. यामुळे जिल्ह्याचा करोनाग्रस्तांचा आकडा 838 वर गेला आहे. तर आज सायंकाळपर्यंत नाशिक शहर व ग्रामिण जिल्ह्यातील 10 रूग्ण करोना मुक्त झाल्याने करोना मुक्त होणार्‍या रूग्णांची संख्या 601 वर गेली आहे.

जिल्ह्यात मालेगाव, नाशिक शहरासह जिल्ह्याच्या इतर भागातही करोनाचा प्रसार वेगाने वाढत आहे. आज मालेगाव शहरातील 30 रूग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. नाशिक शहरातील वडाळा गावात एका 45 वर्षीय पुरूषाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तर जिल्ह्यात मनमाड येथील आंबेडकर चौकातील 3 , नांदगाव पोखरी 1, सिन्नर तालुक्यातील नांदुरशिंगोटे परिसरातील कनकोरी येथील1, रावळगाव येथील 1 व चांदवड येथील 7 वर्षीय मुलीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

यामुळे जिल्ह्यातील अनेक तालुक्यांतील विविध नव्या गावांमध्ये तसेच शहराच्या विवधि नगरांमध्ये करोनाचे पॉझिटिव्ह रूग्ण आढळले आहेत. यामुळे ग्रामिण भागात चिंता व्यक्त होत आहे.

आज दिवसभरात 291 अहवाल जिल्हा प्रशासनास प्राप्त झाले. यामध्ये 271 निगेटिव्ह आले. 38 पॉझिटिव्ह आले, तर 10 करोनाम मुक्त झाले आहेत. करोनामुक्त झालेल्यांमध्ये नाशिक शहरातील 5 व ग्रामिण भागातील 5 जणांचा सामावेश आहे. यामुळे करोनामुक्त होणारांचा आकडाही 601 वर पोहचला आहे. मालेगावची करोना बाधीतांची संख्या वेगाने वाढत असून यात आज 30 जणांची भर पडली.

यामुळे मालेगावचा आकडा 649 वर पोहचला आहे. तर जिल्ह्याचा आकडा 838 वर गेला आहे. यात नाशिक शहरातील 49, जिल्ह्याच्या ग्रामिण भागातील 111 व जिल्ह्याबाहेरील 30 रूग्णांचा समावेश आहे.

दरम्यान जिल्ह्यात आजपर्यंत 40 हजार 211 संशयित रूग्णांचे स्क्रीनींग करण्यात आले आहे. जिल्ह्यातून आजपर्यंत 7 हजार 820 स्वॅब तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. यातील 6 हजार 626 निगेटिव्ह, 838 पॉझिटिव्ह आले आहेत. यातील 187 रूग्ण उपचार घेत आहेत. तर अद्याप 364 अहवाल प्रलबिंत आहेत. तर आज नव्याने 73 संशयित रूग्ण दाखल झाले आहेत.

करोना मुक्त रूग्ण असे

* मालेगाव : 469
* नाशिक : 37
* उर्वरित जिल्हा : 67
* जिल्हा बाह्य : 28
* एकुण कोरोनमुक्त : 601

जिल्हा प्रशासनाच्या अहवालानुसार

* एकूण कोरोना बाधित: 838
* मालेगाव : 649
* नाशिक : 48
* उर्वरित जिल्हा : 112
* एकूण मृत्यू: 42
* कोरोनमुक्त : 601

Related Stories

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com