‘अपोलो’त ३६ वर्षीय रुग्णावर हृदय प्रत्यारोपण शस्रक्रिया यशस्वी
स्थानिक बातम्या

‘अपोलो’त ३६ वर्षीय रुग्णावर हृदय प्रत्यारोपण शस्रक्रिया यशस्वी

Dinesh Sonawane

Dinesh Sonawane

नाशिक | प्रतिनिधी 

संतोष कानडे या महाराष्ट्रातील बीड येथे राहणाऱ्या ३६ वर्षीय रुग्णावर अपोलो रुग्णालयात यशस्वी शस्रक्रिया करण्यात आली.  नवी मुंबई येथील रुग्णालयात ही शस्रक्रिया पार पडली. विशेष म्हणजे या सर्जरीसाठी मयत डोनरकडून हृदय घेण्यात आले.

संतोष यांना झालेल्या आजारामध्ये, हृदयाची ब्लड पम्पिंगची क्षमता कमी होती. हृदयाचे मुख्य पम्पिंग चेंबर असणारी डावी झडप आकाराने वाढते व कमकुवत होते. या क्लिनिकल संज्ञेला डायलेटेड कार्डिओमॅपॅथी (डीसीएम) असेम म्हटले जाते.

दोन लहान मुलांचा पिता असलेल्या या रुग्णाच्या आजाराचे नेमके निदान होण्यापूर्वी त्यांना गेल्या दोन वर्षांपेक्षा अधिक काळापासून पायऱ्या चढताना त्रास होत होता.

वारंवार हॉस्पिटलमध्ये दाखल करूनही त्यांची प्रकृती खालावत चालली होती. तेथील डॉक्टरांनी हार्ट फेल्युअर क्लिनिकमध्ये जाण्याचा सल्ला दिला.

अपोलो हॉस्पिटल्सचे सीव्हीटीएस व हार्ट ट्रान्सप्लांट सर्जरी कन्सल्टंट डॉ. संजीव जाधव म्हणाले की, डायलेटेड कार्डिओमॅपॅथी हे कार्डिओमॅपॅथीचे सर्रास आढळणारे स्वरूप आहे.

या विशिष्ट रुग्णाच्या बाबतीत, हृदय केवळ १७ % काम करत होते आणि त्याला तातडीने हार्ट ट्रान्सप्लांटची आवश्यकता होती. रुग्णासारखाच रक्तगट असणारी ४१ वर्षीय महिला डोनर होती.

या महिलेला रस्त्यावरील अपघातामध्ये ब्रेन-डेड (कॅडव्हर डोनर) जाहीर करण्यात आले. हार्ट ट्रान्सप्लांट सर्जरी ६० मिनिटांमध्ये पूर्ण करण्यात आली. त्यानंतर रुग्णाला आयसीयूमध्ये हलवण्यात आले. आता रुग्णाची प्रकृती स्थिर आहे. रुग्ण लवकरच पूर्णपणे बरा होईल, अशी अपेक्षा आहे

हार्ट ट्रान्सप्लांट सर्जरी ज्यांच्यावर करण्यात आली ते संतोष कानडे म्हणाले, माझे हृदय निकामी झाल्यामुळे जीवनाशी संघर्ष करत मी प्रतीक्षा करत होतो. मला नवीन जीवनदान दिल्याबद्दल मी ऑर्गन डोनर कुटुंबाचा व ट्रान्सप्लांट करणाऱ्या टीमचा मी अतिशय आभारी आहे.

अपोलो नवी मुंबईचे प्रमुख व सीओओ संतोष मराठे यांनी सांगितले की, ३ वर्षे इतक्या अल्प कालावधीमध्ये, आम्हाला यशस्वीपणे कामगिरी करणारे (लिव्हर, किडनी, हृदय व बोन मॅरो ट्रान्सप्लांट) पश्चिम भारतातील एक सर्वात आधुनिक ट्रान्सप्लांट सेंटर म्हणून गौरवण्यात आले आहे. यामुळे आम्ही लक्षणीय प्रगती करत आहोत आणि स्पेशालिस्टच्या टीमच्या मदतीने उत्तम करत आहोत.

Deshdoot
www.deshdoot.com