नाशिक जिल्ह्यात दिवसभरात ३६ रुग्ण करोना पॉझिटिव्ह; आतापर्यंत ९७३ करोनामुक्त
स्थानिक बातम्या

नाशिक जिल्ह्यात दिवसभरात ३६ रुग्ण करोना पॉझिटिव्ह; आतापर्यंत ९७३ करोनामुक्त

Dinesh Sonawane

Dinesh Sonawane

पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या 516, नव्या ३६ जणांची भर

नाशिक । प्रतिनिधी

नाशिक जिल्ह्यात करोनाची सुरूवात झाल्यापासून आतापर्यंत एकुण करोना पॉझिटिव्ह येणाऱ्या रुग्णांचा आकडा 1435 असला तरी दुसर्‍या बाजुला करोना मुक्त होणारांचे प्रमाण 67.80 टक्के इतके चांगले आहे. आतापर्यंत जिल्ह्यातून 973 रूग्णांनी करोनावर मात केली आहे. तर आतापर्यंत 11 हजार 378 नागरीकांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. हा मोठा दिलासा जिल्हा तसेच आरोग्य प्रशासनास आहे. आज दिवसभरात नाशिक जिल्ह्यात 36 करोना बाधित रुग्णांची भर पडली.

मालेगाव पाठोपाठ नाशिक शहर तसेच जिल्ह्यात करोनाचा प्रसार वेगात होत सुरू झाला आहे. आज दिवसभरात जिल्ह्यातील ३६ रूग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तर आज जिल्ह्याभरात नव्याने 54 पॉझिटिव्ह रूग्णांनी करोनावर मात केली आहे.

करोनाचा हॉटस्पॉट ठरलेल्या मालेगाव शहरात करोना मुक्त होण्याचा वेगही सर्वाधिक असून तेथील सर्वाधिक 658 रूग्ण करोना मुक्त झाले आहेत. यानंतर मालेगाव खालोखाल ग्रामिण जिल्ह्यातील 156 रूग्ण बरे झाले आहेत. नाशिक महापालिका हद्दीत करोनाम मुक्त होणारांचे प्रमाण 36 टक्के इतके आहे. महापालिका हद्दीत आतापर्यंत 323 पैकी 116 रूग्ण पुर्ण बरे झाले आहेत.

दरम्यान, मालेगावनंतर नाशिक शहरात रूग्ण संख्या झपाट्याने वाढत आहे. आज दिवसभरात 21 रूग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यात नाशिक शहरातील 5 जणांचा सामावेश असल्याने शहरातील करोना रूग्णांची आकडे वारी 323 वर पोहचली आहे.

ग्रामिण भागातील 15 रूग्ण पॉझिटिव्ह आले आहेत. यामध्ये मालेगाव ५, संगमेश्वर 2, मनमाड 1, विंचुर 2, येवला 1, नांदगाव 1, निफाड 1, माडसांगवी 1, राहुरी 2, आंबे दिंडोरी 1 तर द्याने येथील दिड वर्षाचा बालकाचा समावेश आहे.

जिल्हा बाह्य 1 रूग्णांचा समावेश आहे. यामुळे जिल्ह्यात आतापर्यंत करोना ग्रस्तांची संख्या 1435 वर पोहचली आहे. तर रात्रीपासून आतापर्यत 10 रूग्णांचा मृत्यू झाला आहे. यामुळे जिल्ह्यात मृत्यू होणारांची संख्या 89 झाली आहे.

जिल्ह्यात आज नव्याने 143 करोना संशयित रूग्ण दाखल झाले आहेत. यात नाशिक शहरातील 51, जिल्हा रूग्णालय 12, ग्रामिण 65, मालेगाव 15 संशयित रूग्णांचा सामावेश आहे.

जिल्ह्यात आजपर्यंत 13 हजार 87 स्वॅब तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. यातील 11 हजार 378 निगेटिव्ह आले आहेत, 1435 पॉझिटिव्ह आले आहेत. यातील 373 रूग्ण उपचार घेत आहेत. तर अद्याप 209 अहवाल प्रलबिंत आहेत.

जिल्हा प्रशासनाच्या अहवालानुसार

* एकूण कोरोना बाधित: 1435
* मालेगाव : 817
* नाशिक : 323
* उर्वरित जिल्हा : 231
* जिल्हा बाह्य ः 64
* एकूण मृत्यू: 89
* कोरोनमुक्त : 973

 • करोना मुक्त आकडे असे विभाग संख्या टक्के
  मालेगाव : 817         80.54
  नाशिक : 116          35.91
  उर्वरित जिल्हा : 156 67.53
  जिल्हा बाह्य : 43       67.19
  एकुण : 973             67.80
Deshdoot
www.deshdoot.com