नाशिक जिल्ह्यात ३६ ‘पाॅझिटिव्ह’, एक करोना योद्धा शहीद; सिन्नर, नांदगावसह विंचूरमध्येही रुग्ण आढळले

नाशिक | प्रतिनिधी 

जिल्ह्यात आज ३६ रूग्णांचे अहवाल करोना पॉझिटिव्ह आले आहेत. काल ५० रुग्ण बाधित आढळून आल्यानंतर अवघ्या २४ तासांत रुग्णसंख्येत ३६ रुग्णांची भर पडल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. आज वाढ झालेल्या रूग्णांमध्ये नाशिक शहरातील सर्वाधिक २० तर ग्रामिण भागात सिन्नर, निफाड व नांदगाव तालुक्य करोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत.

यामुळे जिल्ह्याचा करोनाग्रस्तांचा आकडा 1260 झाला आहे. विशेषता आज मालेगाव महापालिकेतील केवळ एक अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तर 20 रूग्ण करोनामुक्त झाले आहेत. यामुळे करोना मुक्त होणारांचा आकडा 846 वर पोहचला आहे.

मालेगावपाठोपाठ नाशिक शहरात करोनाचा उद्रेक सुरू झाला आहे. आज जिल्ह्याभरात नव्याने 36 रूग्णांची भर पडली. रूग्णांचा सामावेश आहे. काल (दि.31) एकाच दिवसात जिल्हाभरात 48 रूग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले होते. तर 11 रूग्णांचा मृत्यू झाला होता. यामुळे जिल्हा प्रशासनाची चिंता वाढली होती.

आज नाशिक शहरातील वडाळागाव, डिसुजा कॉलनी1, पंचवटीतील मधुबन कॉलनी 3, वडाळा, पाटील पार्क, बागवान पुरा, काजीपुरा पंडित पार्क, ओमकार नगर व शिंगाडा तलाव येथील रूग्णांचा समावेश आहे. यामुळे नाशिक शहराचा आकडा २३४ वर पोहचला आहे.

ग्रामिण भागातील मालेगाव तालुक्यातील ध्याने 3, मनमाड 1, ती सिन्नर तालुक्यतील पिंपळे, सोनंबेसह, दापूरमध्ये  येथे रूग्ण आढळले आहेत, यामुळे ग्रामिण भागातील रूग्णांचा आकडा १८५ झाला आहे.

तर मालेगाव शहरात कार्यरत रेल्वे पोलीस व धुळे येथील एका एसआरपी जवानाचा अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तर येथे कार्यरत एका पोलीसाचा मृत्यू झाला आहे. यामुळे जिल्ह्यात एकुण मृत्यू झालेल्यांचा आकडा 73 झाला आहे. तसेच जिल्ह्यात आज 1220 रूग्ण करोना मुक्त झाले असून बरे होणारांचा आकडा 846 वर पोहचला आहे.

दरम्यान जिल्ह्यात आजपर्यंत 11 हजार 800 स्वॅब तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. यातील 10 हजार 40 निगेटिव्ह आले आहेत, 1241 पॉझिटिव्ह आले आहेत.

यातील 317 रूग्ण उपचार घेत आहेत. तर अद्याप 524 अहवाल प्रलबिंत आहेत. दरम्यान आज नव्याने 103 संशयित रूग्ण दाखल झाले आहेत. यात नाशिक शहरातील 22, जिल्हा रूग्णालय 7, ग्रामिण 51, मालेगाव 19 संशयित रूग्णांचा सामावेश आहे.

चौथा करोना योद्धा शहिद

मालेगाव शहर पोलीस ठाण्यात कार्यरत पोलीस जामादार इनुस शेख (57) यांचा करोनामुळे आज दुपारी मृत्यू झाला. 29 एप्रिलला अहवाल पॉझिटिव्ह आल्याने त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. औषोधपचार पुर्ण होऊन कोरोंटाईन नंतर त्यांना घरी पाठवण्यात आले होते. परंतु काही दिवसांपुर्वी पुन्हा त्रास सुरू झाल्याने पुन्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान आज दुपारी 1 वाजता त्यांचा मृत्यू झाला. यापुर्वी 3 पोलीस कर्मचार्‍यांचा मृत्यू झाला आहे.

जिल्हा प्रशासनाच्या अहवालानुसार
* एकूण कोरोना बाधित: १२६०
* मालेगाव : 780
* नाशिक : 222
* उर्वरित जिल्हा : १८५
* जिल्हा बाह्य ः 60
* एकूण मृत्यू: 73
* कोरोनमुक्त : 846