पारनेर : फिर्याद दिल्याच्या रागातून महिलेचा खून
स्थानिक बातम्या

पारनेर : फिर्याद दिल्याच्या रागातून महिलेचा खून

Dinesh Sonawane

Dinesh Sonawane

पारनेर तालुक्यातील वडझिरे येथील घटना; रांधेच्या तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल

पारनेर (तालुका प्रतिनिधी) – तालुक्यातील वडझिरे येथील एका महिलेवर फिर्याद दिल्याच्या रागातून गावठी पिस्तुलातून गोळीबार केल्याची घटना घडली आहे. या घटनेत महिला जागेवर ठार झाली आहे.

यासंबंधी पोलिसांकडून समजलेली माहिती अशी की, सोमवार दिनांक 17 जानेवारी रोजी रात्री 9 वाजून 30 मिनिटांच्या सुमारास आरोपी राहुल गोरख साबळे (रा. रांधे ता. पारनेर) याने सविता सुनील गायकवाड (वय 34 रा. वडझिरे ता पारनेर) यांच्या घरासमोर येऊन गायकवाड यांनी फिर्याद दिल्याच्या व त्याचे नातेवाईकांनी तक्रार दिल्याचा राग मनात ठेवून फिर्यादी संतोष कचरू उबाळे व त्यांची मेव्हणी सविता सुनील गायकवाड यांना शिवीगाळ करून गायकवाड यांच्यावर तीन गोळ्या झाडल्या. गोळ्या हाताला, पंजाला व कानाजवळ लागल्या होत्या. त्यात सुनीत गायकवाड यांचा मृत्यू झाला.

आरोपी राहुल साबळे सोबत अजून एक तरुण असल्याची चर्चा आहे. कचरू उबाळे (वय 38 धंदा शेती रा. वडझिरे ता. पारनेर) यांच्या फिर्यादीवरून पारनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा अधिक तपास पोलीस अधीक्षक सागर पाटील, उपविभागीय अधिकारी अजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पो. नि. राजेश गवळी, सपोनि. विजयकुमार बोत्रे, सपोनि वाघ, पो. उप. नि. बालाजी पद्मने करीत आहेत.

सुनीता गायकवाड यांचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पुणे येथे नेण्यात आला आहे .पोलीस आरोपींचा शोध घेत असून पोलीस निरीक्षक राजेश गवळी यांनी आरोपींच्या शोधासाठी पथके तैनात केली आहेत.

Deshdoot
www.deshdoot.com