Friday, April 26, 2024
Homeमहाराष्ट्रराज्यात एकूण ३३८ रुग्णांना कोरोनाची लागण

राज्यात एकूण ३३८ रुग्णांना कोरोनाची लागण

मुंबई : देशभरात कोरोनाचा प्रार्दुभाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. भारतातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या आता 1 हजार 965 वर पोहचली आहे. कोरोनामुळे आतापर्यंत 50 लोकांचा मृत्यू झाला आहे. धक्कादायक बाब म्हणजे भारतातील कोरोनाग्रस्तांचा आकडा गेल्या 24 तासांत सर्वाधिक वाढला आहे. एका दिवसात तब्बल 328 लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. तर, 151 रुग्ण निरोगी झाले आहे.

भारतातील कोरोनाग्रस्तांची वाढती संख्या चिंतेची बाब आहे. महाराष्ट्रातही सर्वात जास्त म्हणजे 338 कोरोनाबाधित रुग्ण आहेत. राज्यात करोना मुळे ३ मृत्यूंची नोंद झाली.यातील दोन मृत्यू मुंबईत झाले असून त्यापैकी एक ७५ वर्षीय पुरुष आहे तर दुसरा ५१ वर्षीय पुरुष आहे. याशिवाय ५० वर्षीय पुरुषाचा मृत्यू एक मृत्यू पालघर येथे झाला आहे.

- Advertisement -

या तिन्ही रुग्णांनी कोठेही परदेशी प्रवास केल्याचा इतिहास नाही. आतापर्यंत राज्यात करोनामुळे एकूण १३ मृत्यू झाले आहेत.राज्यात आज एकूण ७०५ जण विविध रुग्णालयात भरती झाले आहेत. आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ७१२६ नमुन्यांपैकी ६४५६ जणांचे प्रयोगशाळा नमुने करोना करता निगेटिव्ह आले आहेत तर ३३५ जण पॉझिटिव्ह आले आहेत.

आतापर्यंत ४१ करोना बाधित रुग्णांना ते बरे झाल्यानंतर रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. सध्या राज्यात २४ हजार ८१८ व्यक्ती घरगुती अलगीकरणात असून १८२८ जण संस्थात्मक क्वारंटाईन मध्ये आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या