भुसावळात 3, पाचोर्‍यात 2 पॉझिटिव्ह
स्थानिक बातम्या

भुसावळात 3, पाचोर्‍यात 2 पॉझिटिव्ह

Balvant Gaikwad

Balvant Gaikwad

आतापर्यंत पॉझिटिव्ह रुग्ण 62; एकूण 13 रुग्णांचा मृत्यू

जिल्ह्यात मंगळवारी कोरोना पॉझिटिव्ह 5 रुग्ण आढळले. यात भुसावळ येथील 3, तर पाचोर्‍यातील दोघांचा समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 62 झाली. तर जळगावातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात सध्या 34 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण यांनी दिली आहे.

जळगाव येथील कोविड रूग्णालयात स्वॅब घेतलेल्या 62 कोरोना संशयित व्यक्तीचे नमुना तपासणी अहवाल मंगळवारी प्राप्त झाले आहे. यापैकी 59 व्यक्तींचे अहवाल दुपारी निगेटिव्ह आले. यानंतर पाचोरा व पारोळा येथे स्वॅब घेतलेल्या 14 कोरोना संशयित व्यक्तींचे नमुना तपासणी अहवाल सायंकाळी प्राप्त झाले.

यापैकी 12 व्यक्तीचे तपासणी अहवाल निगेटिव्ह आले आहे. यात पाचोर्‍यातील 30 व 36 वर्षीय दोन तरुण रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. निगेटिव्ह अहवाल आलेल्यांमध्ये 10 व्यक्ती पाचोरा येथील, तर दोन व्यक्ती पारोळा येथील आहेत.

भडगावातील मृत महिला निगेटिव्ह

भुसावळ येथील 58 वर्षीय पॉझिटिव्ह महिला खडका रोड परिसरातील आहे. तर दुपारी निगेटिव्ह अहवाल आलेल्यांमध्ये सम्राट कॉलनी (जळगाव) येथील कोरोना बाधीत व्यक्तींच्या संपर्कातील 15 व्यक्तींचा, तर अडावद (ता. चोपडा) येथील कोरोना बाधीत व्यक्तींच्या संपर्कातील 25 व्यक्तींचा समावेश आहे. तसेच यात भडगाव येथील मृत झालेल्या महिलेच्या तपासणी अहवालाचाही समावेश आहे.

Deshdoot
www.deshdoot.com