नाशिक शहरात गेल्या चार दिवसात ३८४ संशयित दाखल; २७ नवे बाधित; रुग्णसंख्या पोहोचली ७५ वर
स्थानिक बातम्या

नाशिक शहरात गेल्या चार दिवसात ३८४ संशयित दाखल; २७ नवे बाधित; रुग्णसंख्या पोहोचली ७५ वर

Dinesh Sonawane

Dinesh Sonawane

नाशिक । प्रतिनिधी

नाशिक महानगरपालिका क्षेत्रात बुधवारी (दि.20) ते शनिवार (दि.23) अशा चार दिवसात बाधीत रुग्णांच्या संपर्कातील अतिजोखमीच्या 27 व्यक्तींना करोना झाल्याचे समोर आले आहे.

या वाढच्या रुग्णांमुळे नाशिककरांची चिंता वाढली आहे. शनिवारी (दि.23) दुपारी 2 आणि सायंकाळी 6 असे एकुण 8 बाधीत रुग्ण व टाकळी येथील रहिवाशी व अंबोली प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्य सेवकांची जिल्हा रुग्णालयात मृत्यु झाला.

यामुळे आता शहरातील रुग्णांची संख्या आता 75 इतकी झाली असुन शडरातील मृतांची संख्या 4 झाली आहे. दरम्यान वाढत्या संशयितांमुळे आता रुग्णालयात उपचार घेण्यार्‍यांची संख्या 245 इतकी झाली आहे.

शुक्रवारी (दि.22) रात्री शहरात संजीवनगर शिवार (सातपूर अबंड लिंकरोड) येथील मृताच्या संपर्कातील 11 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले होते. त्यानंतर शनिवारी (दि.23) रोजी दुपारी शहरातील निर्माण व्हिला येथील 51 वर्षीय पुरुष व दुसरा राणाप्रताप चौक नवीन नाशिक येथील 34 वर्षीय व्यक्ती अशा दोघांना करोना झाल्याचे स्पष्ट झाले होते.

नंतर सायंकाळी सात वाजेच्या सुमारास समावेश आहे. यात नाईकवाडीपुरा भागातील एका महिला रुग्णांच्या संपर्कात आलेले 4 जण, शिवाजीवाडी भारतनगर येथील बाधीत रुग्णांच्या संपर्कातील 1 जण आणि आगर टाकळी येथील रहिवाशी व आरोग्य सेवक अशा सहा जणांना करोना झाल्याचा अहवाल आला होता. यातील आरोग्य सेवकांचा दि. 22 मे रोजी मृत्यु झाला होता.

अशाप्रकारे 22 व 23 तारखेला 20 बाधीत असल्याचे समोर आले असुन यातील टाकळी येथील आरोग्य सेवकाचा मृत्यु झाला आहे. यामुळेच आता बाधीत रुग्णांच्या संपर्कात आलेले अति जोखमीच्या व्यक्ती करोनाच्या विळख्यात सापडत असल्याचे स्पष्ट झाले आहे.

दरम्यान करोना बाधीत भागातून आलेल्याची संख्या 1943 झाली असुन यातील 815 जणांचा देखरेखीखालील 14 दिवसाचा कालावधी पुर्ण झाला आहे. आत्तापर्यत शहरातील रुग्णालयात 1804 संशयितांना दाखल करण्यात आल्यानंतर उपचार झाल्यानंतर 1622 जणांना घरी सोडण्यात आले.

Deshdoot
www.deshdoot.com