मालेगावात करोनाबाधितांची संख्या २५३ वर; दिवसभरात १४ पोलिसांना करोनाची लागण; जिल्ह्यातील रुग्णसंख्या २७६ वर

jalgaon-digital
3 Min Read

मालेगाव | प्रतिनिधी 

मालेगावमध्ये करोनाचा कहर सुरूच आहे. सायंकाळी आलेल्या अहवालात एकूण ११ रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आल्यानंतर चिंता व्यक्त केली जात असतानाच मध्यरात्री प्राप्त झालेल्या दोन अहवालात जवळपास ४४ रुग्ण वाढल्यामुळे मालेगावची करोनाबाधित रुग्णांची संख्या २२७ वर पोहोचली होती. त्यानंतर पुन्हा २७ रुग्ण मालेगावात वाढले असून मालेगावी करोना बाधित रुग्णांचा आकडा आता २५३ वर पोहोचला आहे.

मध्यरात्री मिळालेल्या अहवालात सहा पोलीस आढळून आल्यामुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे. जिल्ह्यातील करोना बाधितांचा आकडा २७६  वर पोहोचला आहे. तर आतापर्यंत अकरा रुग्ण करोनामुक्त झाले आहेत.

देशदूत डिजिटल अपडेट

नाशिकमधील करोनाची आजची स्थिती

नाशिक महापालिका
पॉझिटिव्ह : 10
मृत्यूः 00
करोना मुक्त : 03

नाशिक ग्रामीणः
पॉझिटिव्ह: 11
मृत्यूः 00
करोना मुक्त: 02

मालेगाव महापालिका
पॉझिटिव्ह : 253
करोनामुक्त : 06
मृत्यूः 12

जिल्हा बाहेर
पॉझिटिव्ह : 02
करोना मुक्त: 00
मृत्यूः 00

नाशिक जिल्हा एकूण
पॉझिटिव्ह : 276

आज नाशिक शहरातील डॉ. वसंत पवार मेडिकल कॉलेजमध्ये तपासणी करण्यात आलेले अहवाल मिळाले. एकूण तीन टप्प्यांत जवळपास  अहवाल प्राप्त झाले असून यामध्ये ७१ अहवाल बाधित आढळून आले आहेत.

विशेष म्हणजे, आज सायंकाळच्या अहवालातील ११ रुग्णांमधील ८ रुग्ण हे पोलीस कर्मचारी होते. यामध्ये एक राज्य राखीव दलाच्या जालना जिल्ह्यातील बंदोबस्तावर आलेल्या जवानाचा समावेश आहे. तर इतर सात कर्मचारी हे वेगवेगळ्या पोलीस ठाण्यातील आणि चौकीतील बंदोबस्तावर असलेले कर्मचारी आहेत.

आज आढळून आलेल्या रुग्णांमध्ये पोलीस कर्मचारी स्थानिक गुन्हे शाखा, जळगाव पोलीस ठाण्याचा कर्मचारी, पोलीस हेड क्वार्टर्सचे दोन पोलीस कर्मचारी, बॉम्बशोधक पथकाचा एक कर्मचारी आणि नाशिकरोड येथील एका कर्मचाऱ्याचा समावेश आहे. इतर रुग्ण हे हकीमनगर, आझमीनगर, मौलाना हनीफ नगर, दत्त नगर, आझादनगर, गुल्शीने इब्राइम नगर येथील रुग्णांचा समावेश आहे.

मालेगावात आज आलेल्या अहवालात ३ महिन्यांच्या चिमुकला, दोन अकरा वर्षीय मुले आणि एका पाच वर्षीय मुलाचा समावेश आहे.  आतापर्यंत मालेगावात १२ करोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर ७ रुग्ण आतापर्यंत करोनामुक्त झाले आहेत. जिल्ह्यातील करोनाबाधित रुग्णांची संख्या आता २३७ वर पोहोचली आहे.

मालेगाव वगळता जिल्ह्यातील इतर तालुक्यांत ११ रुग्ण बाधित आहेत तर नाशिक शहरात ११ रुग्ण बाधित असून यामध्ये तिघांनी करोनावर मात केली असून त्यांना दवाखान्यातून सुट्टी देण्यात आली आहे.

१३ पोलिस आणि एका राज्य राखील दलाच्या जवानास करोनाची लागण

मालेगावात आज ५५ रुग्ण दिवसभरात वाढले आहेत. यामध्ये १४ पोलीस कर्मचारयांचा समावेश आहे. यात शहरातील आयशा नगर पोलीस ठाणे, कॅम्प पोलीस, नियंत्रण कक्ष, दरेगाव पोलीस चौकी, निहालनगर पोलीस चौकी येथील कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. तर मध्यरात्री आलेल्या अहवालात पोलीस कर्मचारी स्थानिक गुन्हे शाखा, जळगाव पोलीस ठाण्याचा कर्मचारी, पोलीस हेड क्वार्टर्सचे दोन पोलीस कर्मचारी, बॉम्बशोधक पथकाचा एक कर्मचारी आणि नाशिकरोड येथील एका कर्मचाऱ्याचा समावेश आहे. यामध्ये एका जालना जिल्ह्यातील राज्य राखीव दलाच्या जवानालादेखील करोनाची लागण झाली आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *