मालेगावी २४ रुग्ण बाधित; नाशिक शहरातील वडाळयातही करोनाबाधित आढळून आल्याने खळबळ

मालेगावी २४ रुग्ण बाधित; नाशिक शहरातील वडाळयातही करोनाबाधित आढळून आल्याने खळबळ

नाशिक । प्रतिनिधी

आज सकाळी मालेगाव शहरात पुन्हा नव्याने २४ पॉझिटिव्ह रूग्ण आढळून आल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. तसेच नाशिक शहरातील वडाळा गावातही एक रुग्ण आढळून आल्यामुळे शहरवासीयांच्या चिंतेत भर पडली. मालेगाव शहरात वाढलेल्या रुग्णांमुळे जिल्ह्यातील रुग्णसंख्या ८२५ वर पोहोचली आहे.

आज सकाळी मालेगावात आढळून आलेल्या रुग्णांमध्ये द्याने रिक्षा थांबा, श्रीरामनगर, समता नगर, पिंपळेश्वर, सावता नगर, आंबेडकरनगर, महात्मा फुले मार्केट, सर सैय्यद नगर, सुमेर नगर व हिंग्लय नगर परिसरातील हे रुग्ण आहेत.

मालेगावातील रुग्णसंख्या वाढल्यामुळे चिंता व्यक्त केली जात असतानाच काल सायंकाळीपर्यंत जिल्ह्यातील 43 रूग्ण करोना मुक्त झाल्यामुळे दिलासा मिळाला आहे. यामुळे जिल्ह्यातील करोना मुक्त होणार्‍या रूग्णांची संख्या ५९१  वर पोहोचली आहे. गेली आहे.

आज सकाळी मालेगावमधील एकूण  १९० नमुन्यांचे अहवाल प्राप्त झाले आहेत. यामध्ये २४ करोनाबाधित सिद्ध झाले आहेत तर १६६ अहवाल निगेटिव्ह आले आहेत. आज मालेगावात आढळून आलेल्या रुग्णांमध्ये  ४, ३, १७, २१ व १५ वर्षीय अल्प्वयीन रुग्ण बाधित आढळून आले असल्याने हा फैलाव रोखणे मोठे आव्हान प्रशासनापुढे आहे.

एकिकडे करोना रूग्ण पॉझिटिव्ह येण्याचे प्रमाण कमी होत असतानाच जिल्ह्यात करोना मुक्त होणार्‍या रूग्णांचे प्रमाण वाढत आहे. आज दिवसभरात ४३ रूग्ण करोनामुक्त झाले असून त्यांना रूग्णालयातून मुक्त करण्यात आले आहे. यामुळे करोना मुक्त होणार्‍या रूग्णांचा आकडा ५९१ वर पोहचला आहे. यात सर्वाधिक करोना मुक्त ४६९ मालेगावचे आहेत. यामुळे उरलेल्या करोनाग्रस्तांचा आकडा २०९ राहिला होता. मात्र, आज सकाळी पुन्हा यात २४ रुग्णांची भर पडली आहे.

जिल्हा प्रशासनाच्या अहवालानुसार

* एकूण कोरोना बाधित: ८२५
* मालेगाव : ६४५
* नाशिक : ४८
* उर्वरित जिल्हा : १०४
* एकूण मृत्यू: ४२
* कोरोनमुक्त :५९१

करोना मुक्त रूग्ण असे

* मालेगाव : ४६९
* नाशिक : ३२
* उर्वरित जिल्हा : ६२
* जिल्हा बाह्य : २८
* एकुण कोरोनमुक्त : ५९१

वडाळा गावात करोनाचा शिरकाव

वडाळागांवत एक रुग्ण आढळून आल्याची माहिती प्राप्त झाली आहे. मात्र, प्रशासनाकडून अद्याप याबाबची महिती देण्यात आली नाही. दुसरीकडे महापालिकेकडून याठिकाणी प्रतिबंधित क्षेत्र जाहीर करण्याची तयारी सुरु आहे. आरोग्य विभागाचे पथक याठिकाणी तपासणीसाठी दाखल झाल्याची माहिती मिळते आहे. आज आढळून आलेला रुग्ण आहे, ट्रक चालक असून तो नियमित मुंबईला जात होता. काल रात्री त्याला संशयित म्हणून रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आता त्याच्या बायकोसह परिवारातील इतर सदस्यांना देखील स्थानबद्ध करण्याची कार्यवाही सुरू आहे. वडाळा गाव पोलीस चौकी पासून काही अंतरावर तो राहायचा.इंदिरानगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक माईनकर यांच्यासह संपूर्ण यंत्रणा या ठिकाणी दाखल झाले असून परिसरातील करण्याची कारवाई सुरू होत आहे.

Related Stories

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com