पारोळा महामार्गावर १८ लाखाची रोकड लुटली :  तिघे संशयित जेरबंद
स्थानिक बातम्या

पारोळा महामार्गावर १८ लाखाची रोकड लुटली : तिघे संशयित जेरबंद

Balvant Gaikwad

पारोळा – 

येथील अमळनेर रस्त्यालगत असलेल्या श्री नवनाथ ट्रेडिंग कंपनीच्या दोन माणसांना धुळे येथून हवाला पेमेंट 18 लाख रुपये घेऊन येत असताना पाठलाग करणार्‍या एक मोटारसायकलस्वाराने धारदार शस्राचा धाक दाखवीत रोख रकमेची लूट केल्याने कापूस व्यासायिकांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.

याबाबत फर्मचे संचालक सुभाष पाटील (रा.चोरवड) यांनी माहिती दिली, की त्यांचे कामगार भागवत सुरेश चित्ते (रा.पारोळा) व एकनाथ पाटील उर्फ महाराज (रा.बहदरपूर) हे दि.24 रोजी सायंकाळी 4 वाजता मोटारसायकल (क्र.एम एच 18 1702) ने धुळे येथे कापूस व्यवसायातील हवाला पेमेंट 18 लाख रुपये घेऊन 6 वाजता  परतीच्या मार्गावर असताना सांयकाळी 6.30 ते 6.45 दरम्यान दळवेल व हॉटेल आनंद दरम्यान मोटारसायकलचा पाठलाग करणार्‍या दुसर्‍याने त्यांच्या वाहनास ओव्हरटेक करत त्यांच्या वाहनास लाथ मारून दोघांना खाली पाडत त्यांच्या ताब्यात असलेले  रोख 18 लाख रुपये असलेली पोतडी त्यांनी लुटून नेल्याचे भागवत पाटील व एकनाथ पाटील यांनी त्यांचे संचालक सुभाष पाटील यांना 7 वाजता सांगितले. सुभाष पाटील यांनी हा प्रकार पारोळा पोलीस स्टेशनला कळवून घटनास्थळी रवाना झाले.

यावेळी पो.नि. लीलाधर कानडे व त्यांचे पथकही पोहचले होते.विशेष म्हणजे सदर घटनेत सदर नवनाथ फर्मच्या दोन्ही माणसांनी धुळे सोडल्यानंतर मूकटीच्यापुढे दळवेल जवळ आमच्या वाहनांचा एक जण मोटारसायकलीवरुन पाठलाग करत असल्याचा फोन सुभाष पाटील यांना केला होता व त्यानंतर अवघ्या 15 मिनिटात लुटीची घटना  घडल्यामुळे व मोटरसायकल चोरटे हे पारोळाकडे पलायन केल्याचे भागवत पाटील व एकनाथ पाटील यांनी सांगितल्याने याबाबत शंका उपस्थित होत आहे. याबाबत रात्री 8 वाजेपर्यंत तरी गुन्हा नोंद झाला नव्हता.

बनावट लूट करणारे तिघे संशयित जेरबंद

पारोळा-येथील आशिया महामार्ग 46 वर सबगव्हाननजीक हवालाचे 18 लाख रुपये घेऊन येणार्‍या एका कापूस व्यापार्‍याचा माणसाला दोन जणांनी मिरचीची पूड फेकून त्यास लुटल्याचा बनावट प्लॅन तयार करून रस्ता लुटीचा प्रकार दि. 24 रोजी सायंकाळी 7.30 वाजता घडला होता.

दि.24 रोजी सायंकाळी 7.30 वाजता  चोरवड  येथील कापूस व्यापारी सुभाष पाटील यांचे कपाशी व्यापार्‍याचे हवालाचे धुळे येथे आलेले 18 लाख रुपये भगवान चित्ते व अन्य एक जण दुचाकीने धुळे येथून पारोळा येथे आणत असताना आशिया महामार्ग 46 वर सबगव्हाननजीक दोन जणांनी त्यांची मोटारसायकल थांबवून त्यांच्या डोळ्यात मिरचीची पूड फेकून त्यांचा कडील 18 लाख रुपये घेऊन पळ काढला, अशी बनावट कहाणी रचून ती भगवान चित्ते यांनी पोलिसांना सांगितली.

पण भगवान चित्ते हा  सांगत असताना तो काही तरी बनाव करीत आहे, हे पोलिसांच्या लक्षात आले. त्यांनी त्याला खरा प्रकार काय हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला. शेवटी पोलिसांनी खाकीचा हिसका दाखविला आणि भगवान चित्ते हा पोपटा सारखा बोलू लागला.

त्याने हा सर्व प्रकार बनाव केल्याचे लक्षात आले व खरा प्रकार उघडकीस आला. त्याने उंदिरखेडे (ता.पारोळा) येथील संदीप परदेशी याने ही लूट केल्याचे सांगितले. तेव्हा पारोळा पोलीस पथक हे उंदिरखेडे येथे गेले असता त्या ठिकाणी संदीप परदेशी नसून तो दीपक परदेशी होता.

त्याने घरातून 17 लाख 96 हजार रुपये रोख काढून दिले. त्या सोबत आणखी एक अनिल बाबूसिंग परदेशी (रा. चाळीसगाव) हा उंदिरखेडे येथे बहिणीकडे आला होता. या बनावट लूट प्रकरणात भगवान चित्ते (43, रा.पारोळा), दीपक परदेशी (34, रा.उंदिरखेडे) अनिल बाबूसिंग परदेशी (23, रा.चाळीसगाव) या तिघांना पारोळा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

या वेळी पोलीस पथकात पोलीस कॉन्स्टेबल सुनील साळुंखे, पंकज राठोड, विजय शिंदे, सुनील वानखेडे, अनिल वाघ यांनी या बनावट प्लॅन मधील तिघांना अटक केली.

यावेळी पो नि लीलाधर कानडे, पोलीस अधीक्षक डॉ पंजाबराव उगले, अप्पर पोलीस अधीक्षक चाळीसगाव विभागाचे सचिन गोरे, अमळनेर उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र ससाणे यांनी घटनास्थळी भेट दिली.

Deshdoot
www.deshdoot.com