नाशिक शहरात दिवसभरात १६ रुग्ण करोना पॉझिटिव्ह; जिल्ह्यातील बळींची संख्या ४८ वर
स्थानिक बातम्या

नाशिक शहरात दिवसभरात १६ रुग्ण करोना पॉझिटिव्ह; जिल्ह्यातील बळींची संख्या ४८ वर

Dinesh Sonawane

Dinesh Sonawane

नाशिक | प्रतिनिधी 

नाशिक जिल्ह्यात करोना पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. आज एकट्या नाशिक शहरात १६ रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत. तर चौघांचा दुर्दैवी अंत झाला आहे. जिल्हाभरातील एकूण रुग्णसंख्या ८९० वर पोहोचली आहे. आतापर्यंत ६५४ रुग्ण करोनामुक्त झाले आहेत तर १९० रुग्ण सध्या रुग्णालयात उपचार घेत आहेत.

नाशिक शहरात आज 16 रूग्ण पॉझिटिव्ह आले. यात चार मुंबई येथून आले आहेत. शहरातील पंचवटी, सातपूर, मोठा राजवाडा, वडाळा पाथर्डी रोड येथील ८ रुग्णांचा समावेश आहे तर मुंबईतील चेंबूर येथील दोन महिला आणि दोन पुरुषांची चाचणी आज बाधित आढळून आली आहे.

ल्ह्यात मालेगाव, नाशिकसह नव्या विविध तालुक्यांतील नव्या गावात करोनाचे रूग्ण आढळून येत आहेत.  नाशिक शहरासह जिल्ह्याच्या इतर भागातही करोनाचा प्रसार वेगाने वाढत आहे.  नाशिक शहरातील वडाळा गावात बुधवारीच  एका 45 वर्षीय पुरूषाचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. यापाठोपाठ आज वडाळा येथील 4 रूग्णांचे अहवान पॉझिटिव्ह आले आहेत. दरम्यान, आज अंबड – सातपूर लिंंकरोडवरील 3 व्यक्ती पॉझिटिव्ह आली आहे. पंचवटीतील राठी संकुलातील 2 तर पोलिस मुख्यालयातील एकाचा समावेश आहे.

आज दिवसभरात 283 अहवाल जिल्हा प्रशासनास  प्राप्त झाले. यामध्ये  252 निगेटिव्ह आले. 35 पॉझिटिव्ह आले, 2 रद्द ठरवण्यात आले तर 2 दुसर्‍यांदा पॉझिटिव्ह आले आहेत.

दरम्यान, करोनामुक्त होणारांचा आकडाही वाढत असून आज एकाच दिवसी 53 जण करोना मुक्त झाले यामुळे करोनामुक्त होणारांचा आकडा 654 वर पोहचला आहे.

मालेगावची करोना बाधीतांची संख्या वेगाने वाढत असून यात आज 19 जणांची भर पडली. यामुळे मालेगावचा आकडा 684 वर पोहचला आहे. तर जिल्ह्याचा आकडा 890 वर गेला आहे.

यात नाशिक शहरातील 59, जिल्ह्याच्या ग्रामिण भागातील 111 व जिल्ह्याबाहेरील 36 रूग्णांचा सामावेश आहे.   जिल्ह्यात आजपर्यंत  41 हजार 541 संशयित रूग्णांचे स्क्रीनींग करण्यात आले आहे.

जिल्ह्यातून आजपर्यंत 8 हजार 80 स्वॅब तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. यातील 6 हजार 978 निगेटिव्ह, 890 पॉझिटिव्ह आले आहेत. यातील 167 रूग्ण  उपचार घेत आहेत. तर अद्याप 235 अहवाल प्रलबिंत आहेत. तर आज नव्याने 224 संशयित रूग्ण दाखल झाले आहेत. यामध्ये मालेगाव येथील 45 , नाशिक शहरातील 60 व ग्रामिण भागातील 112 जणांचा सामावेश आहे. ग्रामिण भागातून रूग्ण वाढत असल्याने प्रशासनाची चिंतेत भर पडली आहे.

* एकूण करोना बाधित: 890
* मालेगाव : 684
* नाशिक : 59
* उर्वरित जिल्हा : 111
* जिल्हा बाह्य ः 36
*  एकूण मृत्यू: 48
* करोनामुक्त : 654

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com