औरंगाबाद जवळ 19 मजुर रेल्वेखाली चिरडले
स्थानिक बातम्या

औरंगाबाद जवळ 19 मजुर रेल्वेखाली चिरडले

Dinesh Sonawane

Dinesh Sonawane

file photo

औरंगाबाद : जालना येथून मध्यप्रदेशात जाणारे सुमारे 19 मजूर रेल्वे खाली चिरडले गेले. आज सकाळी साडेसहा वाजता ही दुर्घटना घडली.

जालना औद्योगिक एका कंपनीत काम करणारे काही मजूर मध्यप्रदेशाकडे निघाले होते. रेल्वेरुळांच्या कडेने हे मजूर भुसावळकडे जात होते, भुसावळहून ते रेल्वेने आपल्या गावी जाणार होते.

चालून थकल्यानंतर काही मजूर रेल्वे रुळांवर झोपले होते. सर्व रेल्वे बंद असल्याची या मजुरांची समजूत असावी. मात्र याचवेळी जाणाऱ्या एका मालवाहू रेल्वेखाली 19 मजूर चिरडले गेले.

औरंगाबाद पासून जवळच निर्जन स्थळी ही दुर्घटना घडली. 15 मजुरांचा मृत्यू झाला असून चार मजूर गंभीर असल्याची माहिती औरंगाबाद ग्रामीण च्या पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांनी दिली.

Deshdoot
www.deshdoot.com