Tuesday, April 23, 2024
Homeनाशिकबैलांना पाणी पाजण्यासाठी गेलेल्या १३ वर्षीय बालकाचा बुडून मृत्यू; मालेगाव तालुक्यातील डोंगराळे...

बैलांना पाणी पाजण्यासाठी गेलेल्या १३ वर्षीय बालकाचा बुडून मृत्यू; मालेगाव तालुक्यातील डोंगराळे येथील घटना

पाटणे | वार्ताहर

बैलांना तलावा वर पाणी पाजण्यासाठी घेऊन गेलेल्या 13 वर्षीय बालकाचा बैलान सोबत खोल पाण्यात ओढला गेल्याने त्याचा दुर्दैवी अंत झाला. तालुक्यातील डोंगराळे येथे घडलेल्या घटनेने गावात शोककळा पसरली आहे.

- Advertisement -

ओम दिलीप अहिरे (रा. डोंगराळे) हे त्या मृत बालकाचे नाव आहे. मालेगाव कॅम्प भागातील केबीएच विद्यालयात सातवीच्या वर्गात तो शिक्षण घेत होता. कोरोना प्रादुर्भावामुळे विद्यालय बंद असल्यामुळे ओम डोंगराळे येथे हे आई-वडिलांकडे गावी डोंगराळे येथे गेला होता.

कुटुंबाची परिस्थिती अत्यंत गरिबीची असल्याने दिलीप अहिरे यांनी नातेवाइकांकडून शेतीची कामे उरकून घेण्यासाठी बैलजोडी मागून आणली होती. तापमान वाढल्यामुळे असल्यामुळे बैलांना तहान लागली असेल हे लक्षात घेत ओम नववीत शिक्षण घेत असलेल्या आपल्या मोठ्या भावा बरोबर बैलजोडीला तलावावर पाणी पाजण्यासाठी घेऊन गेला होता.

तलावाकडे पोहोचताच बैलजोडीने पाण्याकडे धूम ठोकल्याने वेसन पकडलेला ओमही त्यांच्यामागे खोल पाण्यात ओढला जाऊन पाण्यात बुडाला व पोहता येत नसल्याने यातच त्याचा दुर्दैवी अंत झाला.

हा प्रकार पाहत असलेल्या त्याच्या मोठ्या भावाने घराकडे धाव घेत ओम पाण्यात बुडालेल्याचे सांगताच कुटुंबियांनी तलावाकडे धाव घेत एकच आक्रोश केला. शिक्षणात अत्यंत हुशार व प्रेमळ स्वभाव असलेल्या ओम च्या दुर्दैवी मृत्यूने गावावर शोककळा पसरली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या