अबब…१३ फुटी महाकाय तलवार वेधतेय नाशिककरांचे लक्ष
स्थानिक बातम्या

अबब…१३ फुटी महाकाय तलवार वेधतेय नाशिककरांचे लक्ष

Dinesh Sonawane

Dinesh Sonawane

नाशिक | प्रतिनिधी 

काहीतरी नवीन करून दाखवणे हा नाशिककरांचा गुणधर्मच आहे. आजवर नाशिककरांनी साकारलेल्या अनेक कलाकृती आजही लक्ष वेधून घेतात.

शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर नुकतेच नाशिकमधील छत्रपती सेनेच्या वतीने शहरात 13 फुटी भव्य तलवारीचे अनावरण करण्यात आले. सीबीएस येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्या समोर 2 दिवस सर्वाना पाहण्यासाठी ही तलवार ठेवण्यात आली आहे.

आज सकाळपासून प्रचंड गर्दी तलवार बघण्यासाठी झालेली बघायला मिळाली.

Deshdoot
www.deshdoot.com