मालेगावात १२ रुग्ण करोना पाॅझिटिव्ह; तीन, सहा आणि आठ वर्षीय मुलांचा समावेश, जिल्ह्यातील रुग्णसंख्या ८५१ वर

jalgaon-digital
1 Min Read

मालेगाव/नाशिक ।  प्रतिनिधी

मालेगावात आज सकाळी आणखी १२ करोना पाॅझिटिव्ह आढळून आले आहेत. यामध्ये तीन, सहा आणि आठ वर्षीय मुलांचा समावेश असल्यामुळे चिंतेत अधिकची भर पडली आहे. काल (दि.१९) एकट्या  मालेगावात तीस रुग्ण बाधित आढळून आल्यानंतर पुन्हा एकदा आज सकाळच्या अहवालात मालेगावी रुग्णसंख्या वाढल्याने प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे.

आज सकाळी साडेआठ वाजता एकूण ७६ अहवाल प्राप्त झाले. यामध्ये ६३ निगेटिव्ह तर १२ रुग्णांचे अहवाल पाॅझिटिव्ह आढळून आले आहेत. तर एक नमुना रद्दबातल ठरविण्यात आला. आज आढळून आलेल्या १२ रुग्णांपैकी ८ रुग्ण द्याने परिसरातील आहेत. सोयगाव, आंबेडकर नगर, इक्बाल नबी चौक आणि अमान चौकातील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे.

वाढलेल्या आकडेवारीमुळे संपूर्ण नाशिक जिल्ह्यातील करोनाबाधित रुग्णांची संख्या ८५१ वर पोहोचली आहे. तर एकट्या मालेगावात जवळपास ६७२ रुग्ण करोनाबाधित आहेत. दिलासादायक म्हणजे आतापर्यंत मालेगावात ४६९ रुग्ण करोनामुक्त झाले आहेत.

नाशिक जिल्ह्यात आतापर्यंत ८५० रुग्ण पाॅझिटिव्ह आढळून आले आहेत. यात मालेगावात ६७२ रुग्ण, नाशिक शहरात ४८ तर उर्वरित जिल्ह्यात ११२ रुग्ण पाॅझिटिव्ह आहेत. आतापर्यंत जवळपास ६०१ रुग्णांनी करोनावर मात केली आहे. तर ४२ रुग्णांचा दुर्दैवाने करोनामुळे मृत्यू झाला आहे. सध्याच्या स्थितीत २०८ रुग्णांवर करोना कक्षात उपचार सुरु आहेत.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *