११ नायब तहसीलदारांची तहसीलदारपदी पदोन्नती
स्थानिक बातम्या

११ नायब तहसीलदारांची तहसीलदारपदी पदोन्नती

Dinesh Sonawane

नाशिक । प्रतिनिधी

गत सप्टेंबर महिन्यापासून प्रलंबित असलेल्या नायब तहसीलदारांच्या पदोन्नत्या शनिवारी( दि.२३) करण्यात आल्या. त्यात नाशिक विभागातील ११ जणांचा समावेश आहे. नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयातील तीन नायब तहसीलदारांचा त्यात नंबर लागला आहे.

इगतपुरी प्रांत कार्यालयात सेवा बजावलेले आणि पुरवठा विभागात कार्यरत असलेले उदय कुलकर्णी यांची पदोन्नती होत त्यांना रिक्त असलेल्या नांदगाव तालुक्याच्या तहसीलदारपदी नियुक्ती देण्यात आली आहे.

तर नाशिक तहसीलदार कार्यालयात कार्यरत असलेले पुरुषोत्तम कासुळे यांना इगतपुरी तहसीलदार पदी, दूसऱ्या नायब तहसीलदार दिपाळी गवळी यांची संजय गांधी तहसीलदार पदी तर दिंडोरीतील पल्लीव जगताप यांना जिल्हाधिकारी कार्यालयातील कुळकायदा तहसीलदार पदी नियुक्त करण्यात आले आहे.

नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल शाखेच्या तहसीलदारपदी राजेंद्र नजन यांची बदली झाली आहे. तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातील गृह शाखेत यापुर्वी काम केलेले योगेश शिंदे यांची विभागीय आयुक्त कार्यालयातील सर्वसाधारण शाखेच्या तहसीलदारपदी नेमण्यात आले आहे.

हंसराज पाटील यांनी जळगाव येथील निवडणूक शाखेच्या तहसीलदारपदी पदोन्नतीने नियुक्त केले आहे. दरम्यान मुकेश हिवाळे सरदार सरोवर प्रकल्प, नंदूरबार मधील अक्कलकुवा तहसीलदारपदी सचिन म्हस्के, हेमंत पाटील यांची जळगावमधील बोदवड तहसीलदार पदी नियुक्ती करण्यात आली आहे.

Deshdoot
www.deshdoot.com