नाशिक जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या १०८ वर; मालेगावात आज पुन्हा नऊ पॉझिटिव्ह

नाशिक जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या १०८ वर; मालेगावात आज पुन्हा नऊ पॉझिटिव्ह

नाशिक | प्रतिनिधी 

मालेगावमध्ये आज पुन्हा नऊ रुग्ण कोरोनाबाधित आढळून आले आहेत. आज आलेल्या ११ रुग्णांच्या अहवालामध्ये एकूण ९ पॉझिटिव्ह तर इतर दोन निगेटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. एकट्या मालेगावमध्ये आतापर्यंत ९४ रुग्णांना कोरोनाची लागण झाली आहे. यामध्ये एकूण ८ रुग्ण दगावले आहेत. तर नाशिक जिल्ह्यातील बाधितांचा आकडा ९९ वरून १०८ वर पोहोचला आहे.

आज मालेगावमध्ये बाधितांची जी संख्या वाढली आहे. यामध्ये ७ महिला तर दोन पुरुषांचा समावेश आहे. हे रुग्ण कोणत्या परिसरातील आहेत याबाबतची कुठलीही माहिती मिळू शकली नाही.

मालेगावमध्ये सर्वत्र कडक संचारबंदी असूनही रुग्ण वाढल्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे. आज रात्री दहा वाजेच्या अहवालानुसार जिल्ह्यात एकूण कोरोनाबाधित १०८ रुग्ण आहेत. यामध्ये नाशिक शहरात १० रुग्ण असून यात एक रुग्ण कोरोनामुक्त झाला आहे.

नाशिक जिल्ह्यातील इतर तालुक्यांत बाधितांची संख्या चार असून यातही एक रुग्ण कोरोनामुक्त झाला आहे. तर मालेगावी एकूण ९४ रुग्ण कोरोनाबाधित आढळून आले असून यामध्ये एकूण ८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com