धुळे : जिल्ह्यात 10 जण करोनाबाधित
स्थानिक बातम्या

धुळे : जिल्ह्यात 10 जण करोनाबाधित

Balvant Gaikwad

काल रात्रीपासून जिल्ह्यात आणखी दहा रुग्ण पॉझिटिव्ह आले असून यात धुळे शहरात तीन, साक्रीत पाच तर शिरपूरतील दोघांचा समावेश आहे. जिल्ह्यात रुग्णांची संख्या 336 झाली आहे.

धुळे शहर व शिरपूर हॉटस्पॉट ठरत आहे. या शहरांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. आज प्राप्त अहवालानुसार धुळे शहरातील 26 वर्षीय महिला काझी प्लॉट, 63 वर्षीय पुरूष इस्लामपुरा देवपूर, 21 वर्षीय महिला गजानन कॉलनी यांचा समावेश आहे.

तर साक्रीत 52 वर्षीय महिला दहिवेल, साक्री, 24 वर्षीय महिला, 26 वर्षीय महिला आणि 28 वर्षीय महिला सर्व रा. एकता चौक, साक्री, पाच वर्षीय बालक चांदतारा मोहल्ला यांचा बाधितांमध्ये समावेश आहे. शिरपूरात 50 वर्षीय पुरुष, नाथनगरी व 56 वर्षीय पुरुष अंबिकानगर या दोघांना कोरोनाची बाधा झाला आहे.

शिरपुरात अफवा

शिरपूर वरवाडे नगर परिषदेकडून दि. 5 जूनपासून अनेक दुकाने सुरू करण्यास सशर्त परवानगी देण्यात आली आहे. शिरपूर शहरात दोन दिवसापासून अफवांना ऊत आला आहे शिरपूर शहर पाच दिवस बंद राहील अशा अफवा फिरत असतांना प्रशासनाने नागरिकांना आवाहन केले आहे की, कोणत्याही अफवांना बळी पडू नका.

श्री भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयातून सात व धुळे जिल्हा रुग्णालयातून तीन रुग्णांना कोरोनामुक्त झाल्याने डिस्चार्ज देण्यात आला. त्यात धुळे व शिरपूर येथील प्रत्येकी तीन, तर अमळनेर, जि. जळगाव येथील एका रुग्णाचा समावेश आहे.

Deshdoot
www.deshdoot.com