Type to search

ब्लॉग सार्वमत

आता वेब सिरीजचा ट्रेंड…..

Share
गत काही वर्षांमध्ये मनोरंजनाचे साधन विचारले तर प्रथम टीव्ही, रेडियो या साधनांचे नाव समोर यायचे. त्यानंतर हळुहळू काळानुरूप यात आणखी भर पडली ती म्हणजे स्मार्ट फोनची. हा स्मार्ट फोन मानवी शरीराचा एक भागच झाला आहे. आज मानवाला जगण्यासाठी अन्न, वस्त्र, निवारा या गरजांसोबत आता स्मार्ट फोन ही एक चौथी गरज झाली आहे. या स्मार्ट फोनची क्रेझ लहानांपासून ते वयोवृध्द व्यक्तीपर्यंत झाली आहे. त्यात आता इंटरनेटची भर पडल्याने जगातील कोणतीही गोष्ट आपण एका ठिकाणी बसून शोधू शकतो. इंटरनेटची सुविधा आता स्वस्त दरात मिळत असून त्याचा फायदा आता प्रत्येकजण घेऊ लागला आहे. परिणामी स्मार्ट फोन घराघरात पोहोचल्याने आता टीव्ही, रेडियोकडे कोणाचेही लक्ष जात नाही. कुठेही आणि कोणत्याही ठिकाणी आपण फिल्म, वेब सिरीज पाहू शकता.

भारतात सध्या इंटरनेटचा वापर वेगाने वाढत असल्याने वेब सिरीजसारख्या नव्या मनोरंजनाच्या माध्यमांचा वापरही हळुहळू रुळत आहे. मागील काही वर्षी बॉलिवूडमधील मोठमोठ्या अभिनेत्यांचे चित्रपट आले; परंतु चित्रपटांत त्यांना जास्त काही वाव नाही मिळाला. त्यात काही निर्माते, अभिनेत्यांना अपयश आले. चित्रपट तयार झाल्यावर रिलीज होण्याआगोदरच लिंक होण्याचे प्रमाण वाढताना दिसत आहे. तात्काळ मिळणार्‍या सुविधेवर लोक अवलंबून आहे. यामुळे फार काही चित्रपटांना फटका बसत आहे. यामुळे लोक आता स्मार्ट फोनवर उपलब्ध असणार्‍या विविध अ‍ॅप्स जसे की, यू ट्यूब, अ‍ॅमेझॉन प्राईम, आल्ट बालाजी, व्हूट व नेटफ्लिक्स अशा अजून काही अ‍ॅप्सवर वेब सिरीजचा 2012 ते 2013 पासून धडाका चालू आहे.

यू ट्यूबवर सहा वर्षांपूर्वी ‘ऑल इंडिया बकचोद’ नावाची वेब सिरीज चांगलीच गाजली होती. ही वेब सिरीज एका शोची होती ज्यात बॉलिवूड चित्रपट निर्माता करण जोहर सह अभिनेते रणवीर सिंह व अर्जुन कपूर होते. यामध्ये प्रथमच करण जोहर यांनी रोस्ट कॉमेडी नावाचा प्रकार आणला. की ज्यामध्ये शिव्यांचा जास्त प्रमाणात वापर होता. की ज्या बड्या अभिनेत्याकडून अपेक्षित नव्हत्या. त्यामुळे हा शो चांगलाच चर्चेचा विषय बनला. तेव्हापासून वेब सिरीजची क्रेझ वाढत चालली. प्रेक्षकांना नेहमी काही ना काही नवीन पाहिजे असते. जो नवीन काही विषय देईल त्यालाच चांगलीच पसंती देण्यात येते. हेच वेब सिरीज निर्मात्यांनी व दिग्दर्शकांनी आभ्यास करून लोकांना नवीन विषयांवर प्रोग्राम देण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यामध्ये सेक्स, क्राईम, रोमँटिक, अ‍ॅक्शन, यासारख्या विषयांचा मसाला करून आता नवीन क्रेझ निर्माण केली आहे.

सध्याच्या घडीला चित्रपटांना काही नियम बनविले आहेत. चित्रपटात देण्यात येणार्‍या शिव्या, सेक्स, आक्षेपार्ह वक्तव्य यावर निर्बंध लादले गेले आहेत; परंतु वेब सिरीज मध्ये अशा काही गोष्टींना निर्बंध अजून तरी लादले गेले नाहीत. त्यामुळे त्यांना निर्माण केलेल्या स्टोरीला चांगलीच पसंती मिळत आहे. काही वर्षांपूर्वी लस्ट स्टोरीज नावाची वेब सिरीज आली; तिने चांगलाच धुमाकूळ घातला. कमी कालावधीत लोकांच्या मनात बसलेली वेब सिरीजमध्ये मनीषा कोईराला, संजय कपूर, कियारा अडवाणी, भूमी पेडणेकर, विकी कौशल, राधिका आपटे, आकाश ठोसर, अशी बडी स्टारकास्ट आहे. बाईच्या मनातील सुप्त लैगिंक इच्छा त्या पूर्ण करण्यासाठीची धडपड या सगळ्याचे चित्रण वेब सिरीज मध्ये करण्यात आले. यांचे दिग्दर्शन अनुराग कश्यप, झोया अख्तर, करण जोहर, दिबाकर बॅनर्जी अशा बड्या दिग्दर्शकांनी केले आहे.

त्यानंतर वेब सिरीजमध्ये बदल होऊन नव्या अ‍ॅक्शन सिरीज उदयाला आणून नेटफ्लिक्स वर सॅक्रेड गेम नावाची हिंदी वेब सिरीज 2018 ला रिलीज झाली. या वेबसिरीजने नेटफ्लिक्स वर चांगलाच धुमाकूळ घातला व पहिला सिजन पूर्ण केला. या सॅक्रेड गेम या वेबसिरीजचे दिग्दर्शन अनुराग कश्यप, विक्रमादित्य मोरवानी यांनी केले. या बड्या कलाकारांना घेऊन कमी वेळात चांगला प्रतिसाद मिळविला. यामध्ये राजश्री देशपांडे, नवाजुद्दीन सिद्दिकी, सैफ अली खान, राधिका आपटे, सुरवीन चावला, पंकज त्रिपाठी, करण वाही, कल्फी केकला, अनुप्रिया, रणवीर शोरा व छोट्या रोलसाठी मराठीतील काही अभिनेत्यांनीही काम केले. यामध्ये गिरीश कुलकर्णी, जितेंद्र जोशी यांनीही काम केले. हिंदीतील पहिली वेब सिरीज बड्या बॅनरखाली व सेक्स, क्राईम, थरारक रहस्य यांचा मसाला करून निर्मिती केली आहे.

यामुळे लोकांनी चांगला प्रतिसादही दिला आहे व पूर्णपणे या वेब सिरीजला यश मिळाले आहे. 97 टक्के लोकांना ही वेब सिरीज आवडली आहे. पहिल्या सिजनला चांगले यश मिळाल्यावर त्यांनी आता दुसर्‍या सिजनची निर्मितीच्या तयारीला लागले आहेत. यामुुळे आता लोकांनीही उत्सुकता लागली आहे. सिजन 2 मध्ये नवीन काय मिळणार आहे, हे पाहायचे.
वेब सिरीजवर काही बंधने नसल्यामुळे त्यांना चांगले पाठबळ मिळत आहे. यामुळे लोकांचेही लक्ष याकडे वळविण्याचा मार्ग तयार करीत आहेत. चित्रपट हा एके काळचा आहे की काय असा प्रश्‍न आता उद्भवू शकतो.

वेब सिरीज मध्ये बडे बडे बॅनर आता येऊ लागले आहेत. या क्षेत्रातील यश पाहता आता बॉलिवूडमधील शाहरूख खानही वेब सिरीजकडे वळत आहे. शाहरूख खान त्यांचे प्रोडक्शन हाऊस रेड चिली एंटरटेन्मेंट या बॅनर खाली बर्ड ऑफ बोल्ड ह्या वेब सिरीजच्या नावाची घोषणा काही दिवसांपूर्वी शाहरूखने केली आहे. आता वेब सिरीजचा नवा उदय होताना दिसत आहे. या वेब सिरीजच्या ट्रेंडचा उदय पाहता आता चित्रपट क्षेत्राला याचा काही फटका बसतो का हे पाहवे लागेल! चित्रपट आला की सिनेमागृहात जावे लागते. पैसे खर्च करावा लागतात; मात्र जर घरातच सगळ्या गोष्टी बसून मिळत असतील तर खर्च परवडणारा आहे.

बॉलिवूडपासून ते मराठी, टॉलिवूड मधील सुद्धा अभिनेते आता वेब सिरीजलाच पसंती देत आहेत. वेबसिरीज मध्ये काम करण्यासाठी उत्सुकता त्यांना असते व नवीन काही करण्याची संधी मिळते. यामुळे तिकडे वळतात. याचा फटका किंवा गळती चित्रपटला लागते का हे सांगणे अवघडच आहे. मराठीतही बॅग बॅचर या वेब सिरीज अल्प काळातच प्रेक्षकांना आवडली आहे. आता मराठीत येणार्‍या वेब सिरीज अधिराज्य अजमावणार का, हे पाहणे उत्सुक ठरणार आहे. एकेकाळी इंटरनेट, स्मार्टफोन, हे वेगळ्या मक्तेदारीसाठी वापरात असत.

जसे आता स्मार्टफोन प्रत्येकाच्या हाती आला व इंटरनेट ही सुविधा स्वस्त दरात मिळू लागली तसे आता स्मार्टफोनवर वेगवेगळे प्रयोगही होऊ लागले आहे. आता हजारो अ‍ॅप्स आणि त्यावर चालू असणार्‍या वेब सिरीज यांना नेटकर्‍यांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. अजुन चांगल्या प्रतिसाद मिळेल असे वाटत आहे. येत्या नव्या काळात नवनवीन ट्रेंड, संकल्पना, अ‍ॅक्शन येतील व त्याला चांगला प्रतिसाद मिळेल.

आता तरी ट्रेंड आहे तो वेब सिरीजचा! सोशल मीडिया, स्मार्टफोन, ही मनोरंजनाची माध्यमे होतील असे वाटत नव्हते. नवनव्या तंत्रज्ञान येऊ लागले आणि त्यात बदल झाल्यामुळे ते आता लोकांच्या मनाला रुचत आहेत. बदलत्या काळानुसार सिनेमा, टीव्ही, यांना पर्याय म्हणून वेब सिरीजचा उदय झाला. आणि कमी कालावधीतच तो लोकांच्या मनाला रुचत हे मात्र खरे आहे. नवनवीन संकल्पना आहे तो पर्यंत वेब सिरीजला आता तरी मरण नाही. परंतु चित्रपटांच काय होईल हे मात्र सांगण कठीण झाले आहे. आता पाहावे लागेल ते वेब सिरीजचा जमाना कसा असेल व किती यशस्वी असेल ते!

– अरविंद आरखडे
 9689602039

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!