नाशिक ग्रामीण पोलीस मुख्यालयात वृक्षारोपण

0
नाशिक | राज्य शासनाच्या वतीने १ ते ७ जुलै दरम्यान वनमहोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. त्या अनुषंगाने नाशिक ग्रामीण पोलीस दलातर्फे २०,००० वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट साध्य करण्यात येणार आहे.

आज रोजी नाशिक ग्रामीण पोलीस मुख्यालय परिसरात पोलीस अधीक्षक संजय दराडे यांच्या हस्ते महोत्सवास प्रारंभ करण्यात आला. मुख्यालयातील पोलीस परेड मैदान, पोलीस वसाहत, पोलीस अधीक्षक कार्यालय, मोटर परिवहन विभाग परिसरात वृक्षारोपण कार्यक्रम घेण्यात आला. वृक्षारोपण कार्यक्रमादरम्यान उपस्थितांनी सुमारे ६०० रोपांची लागवड केली.

वृक्षारोपण कार्यक्रम प्रसंगी नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संजय दराडे, पोलीस उपअधीक्षक मुख्यालय एस व्ही जाधव, पोलीस निरीक्षक स्थागुशा अशोक करपे, पोलीस निरीक्षक एस जी मांडवकर, यांचेसह मुख्यालयातील पोलीस अधिकारी व कर्मचारी, तसेच पोलीस कुटुंबियांसह शालेय विद्यार्थी देखील उपस्थित होते. जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाणे परिसरात नागरिकांचे सहभागाने जास्तीत जास्त वृक्षांची लागवड करावी असे आवाहन याप्रसंगी करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

*