वृक्षाचा वाढदिवस साजरा

0
बोलठाण (वार्ताहर) | महाराष्ट्र शासनाकडून मागील वर्षी करण्यात आलेल्या 2 कोटी वृक्ष लागवडीच्या वर्षपूर्तीनिमित्त अनेक झाडांचा पहिला वाढदिवस झाला असून बोलठाण ता. नांदगाव येथील ग्रामपंचायतीच्या व्यापारी संकुलात लावलेल्या निंबाच्या झाडाचा वाढदिवस व्यापार्‍यांनी केक कापून साजरा केला.

वृक्ष लागवड म्हटली की, ती फक्त फोटोसेशन पुरतीच मर्यादीत राहते. अनेक वेळा तर सकाळी लावलेले वृक्ष सायंकाळी गायब असते. परंतु पर्यावरणाचा ढासळता असमतोल बघता वृक्षलागवड व संवर्धनाविषयी जागृती वाढली असून याचाच एक भाग म्हणून येथील व्यापार्‍यांनी वर्षभर या निंबाच्या रोपट्याचे संवर्धन करत नुकताच त्याचा पहिला वाढदिवस साजरा केला.

वृक्षप्रेमींनी साजरा केलेला हा वाढदिवस सध्या परिसरात चर्चेचा विषय असून यावेळी संतोष माने, आनंद काकडे, चंद्रकांत चव्हाण, अफजल पटेल, फकरुद्दीन शेख, नीलेश दायमा, दीपक उगले आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

*