सापळा रचून विधी संघर्षीत बालक ताब्यात

0
नाशिक : उंटवाडी येथील रिमांड होममधील विधी संघर्षीत बालक गेल्या काही दिवसांपूर्वी फरार झाला होता. अखेर नाशिक शहर पोलिसांनी सापळा रचून या बालकाला गंगाघाट परिसरातून ताब्यात घेऊन पुढील कारवाईसाठी मुंबईनाका पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, सतरा वर्षीय मुलगा रिमांड होममधून येथील कर्मचाऱ्यांची नजर चुकवून पळाला होता. याबाबत गेल्या आठवड्यात (दि.०७) रोजी मुंबई नका पोलीस स्टेशनमध्ये मिसिंग ३२/२०१७ अन्वये रजिस्टर करण्यात आले होते.

गुन्हे शाखेचे युनिट १ चे नाशिक शहर सहायक पोलीस निरीक्षक मोहिते, खैरनार सायंकाळी चार साडेचार च्या सुमारास गस्त घालत असतांना गुप्त माहितीच्या आधारे सापळा रचून या विधीसंघार्षित बालकास ताब्यात घेण्यात आले.

LEAVE A REPLY

*