मालेगाव मनपा आयुक्तपदी संजय दैने

jalgaon-digital
2 Min Read

मुंबई | प्रतिनिधी | Mumbai

राज्य सरकारने (State Government) भारतीय प्रशासकीय सेवेतील 14 सनदी अधिकार्‍यांच्या बदल्या केल्या. या अधिकार्‍यांमध्ये अलीकडेच आयएएस (IAS) म्हणून बढती मिळालेल्या काही अधिकार्‍यांचा समावेश आहे. गोंदिया जिल्हा जाती प्रमाणपत्र पडताळणी समितीचे अध्यक्ष संजय दैने (Sanjay Daine) यांची बदली मालेगाव महापालिकेच्या आयुक्तपदी करण्यात आली आहे…

कौशल्य विकास विभाग, नवी मुंबई येथील आयुक्त दीपेंद्रसिंह कुशवाह (Deependrasinh Kushwaha) यांची बदली मंत्रालयात उद्योग विभागाच्या सहसचिवपदी झाली आहे. तर पालघर जिल्हा जाती प्रमाणपत्र पडताळणी समितीचे अध्यक्ष नीलेश गटणे (Nilesh Gatne) यांची बदली नांदेड महापालिका आयुक्तपदी करण्यात आली आहे.

अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक अनिल पाटील (Anil Patil) यांची बदली सचिव, प्रदेश नियंत्रण प्राधिकरण मुंबई या पदावर तर पी. डी. मलिकनेर (P. D. Malikner) यांची सहमुख्य कार्यकारी अधिकारी, एमआयडीसी, मुंबई यांची नियुक्ती आहे त्याच पदी झाली आहे.

सुरेश जाधव (Suresh Jadhav) यांची नेमणूक कामगार आयुक्तपदी तर पुणे महसूल विभागाचे उपायुक्त प्रताप जाधव (Pratap Jadhav) यांची नियुक्ती उपमहासंचालक, यशदा, पुणे येथे झाली आहे.

कुमार खैरे (Kumar Khaire) यांची नियुक्ती सह. व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास मंडळ या पदावर तर महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीचे सह. व्यवस्थापकीय संचालक गोविंद बोडके (Govind Bodke) यांची नियुक्ती अकोला महापालिकेच्या आयुक्तपदी झाली आहे.

एस. जी. देशमुख (S. G. Deshmukh) अध्यक्ष, जिल्हा जाती प्रमाणपत्र पडताळणी समिती, ठाणे यांचे नियुक्ती अतिरिक्त मुद्रांक नियंत्रक, मुंबई या पदावर, एम. देवेंद्र सिंह (M. Devendra Singh) यांची नियुक्ती संचालक, महाराष्ट्र शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद, पुणे येथे झाली आहे.

राहुल कर्डिले (Rahul Kardile) यांची सह महानगर आयुक्त, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण मुंबई येथे तर जी. एस. पापळकर (G. S. Papalkar) यांची नियुक्ती जिल्हाधिकारी, हिंगोली या पदावर आणि हिंगोलीचे जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी (Ruchesh Jayavanshi) यांची बदली व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ, अकोला या पदावर करण्यात आली आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *