14 एपीआय व 30 पीएसआयच्या बदल्या

0
अहमदनगर (प्रतिनिधी) – पोलीस दलातील एक हजार 325 पेक्षा जास्त पोलीस कर्मचार्‍यांच्या बदल्या झाल्यानंतर 14 सहायक पोलीस निरीक्षक व 30 पोलीस उपनिरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. त्यात शहरतील कोतवाली व तोफखान्याचा अधिकारी व कर्मचारी वर्ग बदलल्यामुळे काम कमी व रिकामटेकड्या उद्योगांना उधाण येण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
सहायक पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांची कोतवाली ते स्थानिक गुन्हे शाखा येथे बदली करण्यात आली आहे. धुळ्याहुन बदलुन आलेले प्रकाश पाटील यांची कोतवालीत तर बॉम्ब शोधक पथकाचे बजरंग चौघुले यांची शहर वाहतूक शाखेत कार्यरत केले आहे. तोफखाना पोलीस ठाण्याचे अतुल चिंतले यांची जामखेड, एपीआय पाळदे यांची नगर तालुका पोलीस ठाण्यात बदली करण्यात आली आहे. यांच्यासह अन्य 14 अधिकार्‍यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.
तर पोलीस उपनिरीक्षकांमध्ये कोतवालीचे गजानन करेवाड भिंगारला, एमआयडीसीचे शिवाजी नागवे कोतवालीत, तोफखान्याचे विकास काळे अकोले पोलीस ठाणे, कल्पना शिरदावडे कोतवालीत, सुधीर पाटील स्थानिक गुन्हे शाखा, एमआयडीसीच्या स्वाती देवाडकर तोफखान्यात, भिंगारचे गुट्टे स्थानिक गुन्हे शाखा, शिर्डीचे कहाळे कोपरगाव शहर, श्रीगोंदा पोलीस ठाण्याचे संजयकुमार सोने तोफखाना पोलीस ठाण्यात.
अशा 30 पीएसआय अधिकार्‍यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. पोलीस अधिक्षक रंजनकुमार शर्मा यांनी अधिकारी व कर्मचार्‍यांच्या बदल्या पारदर्शक केल्या आहेत. शहराच्या पोलीस ठाण्यात येण्यासाठी सर्व पोलीस दल इच्छूक आहे. मात्र यापुर्वी याच कर्मचार्‍यांच्या करामती पाहुन तत्कालीन अधिकार्‍यांनी त्यांच्या बदल्या केल्या आहेत.
आता हे कर्मचारी पुन्हा नव्याने या पोलीस ठाण्यात आल्यामुळे आतापासूनच यांची मोर्चेबांधणी सुरु झाली आहे. सद्या कार्यरत असणारे प्रस्थापित कर्मचारी व जुने प्रस्तापित मात्र आज नव्याने हजर झालेले कर्मचारी यांच्यात दोन गट पडले आहेत. त्यामुळे कामाला लागण्या आधीच यांच्यात तु-तू मै-मै सुरू झाल्याचे दिसत आहे.
पोलीस अधिक्षक पारदर्शी असले तरी प्रत्येक पोलीस ठाण्यातील अर्थपुर्ण तडजोडी जैसे थे चालु आहेत. त्यामुळे काम करण्याची संधी दिलेल्या अधिकार्‍यांनी संधीचे सोने करणे आवश्यक ठरणार आहे. अन्यथा निलंबन, नियंत्रण कक्षेत बदली, पोलीस मुख्यालयात बदली अशा कारवाया पुन्हा पहावयास मिळणार आहे.

गुन्हे निर्गतीचे काय? गुन्हे निर्गतीचे काय? पोलीस अधिक्षकांनी हवे तेथे पोलीस ठाणे दिले. त्यामुळे कार्यकाळा पुर्ण झालेला नसल्यांनी बदल्या करुन घेतल्या. त्यात सर्वाधिक प्रमाण तपासी अधिकार्‍यांचे आहे. कोतवाली सारख्या ठिकाणी सर्व नव्याने कर्मचारी देण्यात आले आहे. तेथील बहुतांश तपासी अधिकारी बदलुन गेले आहेत. त्यामुळे गुन्हे निर्गतीचे प्रमाण राम भरोसे राहण्याची शक्यता आहे.

पोलीस ठाण्यात दोन गट पोलीस ठाण्यात दोन गट शिक्षा म्हणून शहरातुन बदली केलेले प्रस्तापित कर्मचारी पुन्हा शहरात आले आहे. त्यांच्या नंतर काही कर्मचार्‍यांनी पोलीस ठाण्यात व हाद्दीत स्वत:चे वर्चस्व निर्माण केले आहे. आता जुने कर्मचारी आल्यामुळे पोलीस ठाण्यातच दोन गट निर्माण झाले असून त्यांच्यावर वाद निर्माण होत असल्याचे चित्र दिसत आहे. त्यासाठी अधिकार्‍यांशी सलगी ठेवण्याचे काम सद्या सुरू असून अधिकार्‍यांवर जरब ठेवण्याचे काम पोलीस अधिक्षकांना करावे लागणार आहे. 

स.पो.नि. बदलीचे ठिकाण स.पो.नि. बदलीचे ठिकाण जगदिश भालेराव – वाचक शाखा विकास देवरे – शिर्डी पो.स्टे. दिलीप राठोड – राहुरी पो.स्टे. संदीप पाटील – एलसीबी. किशोर परदेशी – नगर तालुका विलास थोरात – रिडरएसपी.ऑफिस अरूण परदेशी – संगमनेर शहर सरोदे – जामखेड बजरंग चौगुले – शहर वाहतूक नितीन पगार – जिल्हा वाहतूक बेहराणी अनिल – सायबर सेल प्रकाश पाटील – कोतवाली पो.स्टे. विश्‍वनाथ सिद – श्रीगोंदा

LEAVE A REPLY

*