Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

इगतपुरी तालुक्यात मसळधार पाऊस सुरूचं; नागरीकांच्या घरात पाणी; अनेक रेल्वे गाड्या रद्द

Share

इगतपुरी : वार्ताहर

मुंबईत तुफान पाऊस सुरू असल्याने याचा मध्य रेल्वेवर परिणाम झाला असुन अनेक रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. काल मध्यरात्रीपासून पुन्हा पावसाने जोर धरल्याने मुंबई व कसारा रेल्वे स्थानकात प्लॅटफॉर्मवर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने मध्य रेल्वेच्या मुंबई व कसारा अप व डाऊनची वाहतूक ठप्प झाली आहे.

तर इगतपुरी रेल्वे स्थानकात पहाटे चार वाजेपासून दुरंतो एक्सप्रेस उभी असून त्याचबरोबर सकाळी साडेसहाला येणारी येणारी मंगला एक्स्प्रेस आज इगतपुरी रेल्वे स्थानकात आठ वाजता दरम्यान आली. यामुळे प्रवाशांचे मोठ्या प्रमाणात हाल झाले तर रेल्वे प्रशासनाकडुन प्रवाशांना कुठल्याही प्रकारची सुविधा करण्यात आलेली नाही.

दुरांतो एक्सप्रेस मध्ये लहान मुले व महीला मोठया प्रमाणात असुन रेल्वे प्रशासनाकडुन कोणत्याही प्रकारची खानपानची व्यवस्था अद्याप पर्यंत केलेली नाही. याबाबत रेल्वे प्रशासनाला विचारणा केली असता, आम्ही सर्व सोयी पुरविल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र प्रवाशांपर्यंत कोणतीच सुविधा अथवा खानपानची व्यवस्था न पोहचल्याने रेल्वे प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली आहे. पाच तासापासून दुरंतो एक्सप्रेस रेल्वे स्थानकावर उभी असल्याने पुढे कधी जाणार याची काळजी प्रवाशांना पडली आहे.

रद्द केलेल्या गाड्या 

राज्यराणी एक्सप्रेस, सेवाग्राम एक्सप्रेस, गोदावरी एक्सप्रेस, या गाड्या रद्द करण्यात आल्या असून गेल्या 27 तारखेपासून पुणे भुसावळ एक्सप्रेस ही गाडी मनमाड वाया वळवण्यात आली आहे. तर चाकरमान्यांची लाईफ लाईन समजली जाणारी पंचवटी एक्सप्रेस इगतपुरी रेल्वे स्थानकावर येऊन रद्द करण्यात आली आहे. दोन तासानंतर पंचवटी एक्सप्रेस पुन्हा मनमाडकडे रवाना केली जाणार असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली.

तालुक्यात गत हप्ताभरापासुन मुसळधार पाऊस सुरु असुन तालुक्यातील सर्व धरणे तुडुंब भरुन ओव्हरफ्लो झाले आहेत. यामुळे या सर्व धरणातुन हजारो क्युसेस पाणी सोडण्यात येत असल्याने गावांना जोडणारे बरेच पुल पाण्याखाली गेल्याने काही गावांचा संपर्क तुटला आहे. इगतपुरी शहरातील जुन्या मुंबई आग्रा महामार्गावर दोन ते तीन फुट पाणी साठत असल्याने हे पाणी थेट नागरीकांच्या घरात व दुकानात घुसल्याने लोखो रूपयांची हानी झाली आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!