खुशखबर : 153 रुपयांत ग्राहकांच्या आवडीचे 100 चॅनेलस

0
नवी दिल्ली : आता केबल आणि डीटीएच वापरकर्ते 130 रुपयांच्या ( जीएसटीसह 153.40 पैसे) पॅकमध्ये 100 निःशुल्क किंवा शुल्क असलेल्या वाहिन्या पाहू शकतात. यापूर्वी अशाप्रकारचा पर्याय नव्हता. यासाठी 31 जानेवारीपर्यंत ग्राहकांना आपल्या आवडीच्या 100 वाहिन्यांची निवड करणं आवश्यक आहे, कारण 1 फेब्रुवारीपासून हे नवे नियम लागू होतील असे आदेशच भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाने (ट्राय) दिले आहेत.

१ फेब्रुवारीपासून नवीन नियम लागू होणार आहेत. केबल ऑपरेटर आणि डीटीएच सेवा पुरवठादारांनी ग्राहकांना प्रति महिना १५३.४० रुपयांप्रमाणे शंभर चॅनेल दाखवावेत. यात जीएसटीचाही समावेश असेल, असेही ट्रायने म्हटले आहे. या शंभर चॅनेलमध्ये एचडी चॅनेलचा समावेश नसणार आहे.

दोन चॅनेलसोबत एक एचडी चॅनेल निवडता येवू शकतो, असे काही मीडिया एजन्सीने म्हटले होते. एका चॅनेलसाठी १९ रुपयांपेक्षा अधिक रक्कम मोजण्याचा आणखी एक निर्णय ट्रायने रद्द ठरवला आहे. ग्राहकांना पसंतीची चॅनेल निवड करण्याची संधी आहे. जर यासंदर्भात काही अडचण आल्यास ट्रायने फोन नंबरवर संपर्क साधण्याचे ग्राहकांना आवाहन केले आहे.

याबाबत ग्राहकांनी आपआपल्या सेवा पुरवठादारांशी संपर्क साधून योग्य ती माहिती घ्यावी. योग्य माहिती मिळत नसल्यास ग्राहक 011-23237922 ( ए.के.भारद्वाज), 011-23220209 ( अरविंद कुमार) या क्रमांकांवर फोन करु शकतात, किंवा advbcs-2@trai.gov.in आणि arvind@gov.in या इमेल आयडीवर मेल करुन माहिती जाणून घेऊ शकतात.

 

LEAVE A REPLY

*