कमालपूर बंधार्‍यावरून जिवघेणी वाहतूक!

0
टाकळीभान (वार्ताहर)- श्रीरामपूर तालुक्याच्या पुर्व भागातील कमालपुर येथील कोल्हापुर बंधार्‍याच्या पुलाला खेटुन पाणी वहात असतानाही कठडे नसलेल्या या पुलावरुन जिवघेणी वहातुक सुरु आसल्याने पुलावरील खड्डे व पाण्याचा प्रवाह यातुन कसरत करीत गोदावरीचे पाञ पार करण्याचा थरार सध्या सुरु आहे.
श्रीरामपूर तालुक्यात पावसाचे प्रमाण अत्यल्प आसले तरी नासिक जिल्ह्यात पडणार्‍या जोरदार पावसाने गोदावरी दुथडी वाहत आहे. तालुक्यातील कमालपुर येथील कोल्हापुर बंधार्‍यावरील पुलाने नगर व औरंगाबाद दोन्ही जिल्ह्यांना जवळचा दळणवळणाचा मार्ग जोडला गेला आहे.
त्यातच संत गंगागिरी महाराजांचा अखंड हरीनाम सप्ताह लासुर जवळील गवळी शिवरा येथे सुरु आसल्याने श्रीरामपूर तालुक्यातील भावीकांची मोठी वर्दळ या पुलावरुन सुरु आहे. गोदामाई दुथडी भरुन वाहत आसल्याने पाण्याचा विसर्ग पुलाला खेटुन वाहत आहे.
माञ पुलाला संरक्षक कठडेच नसल्यामुळे वाहन धारकांना जिव मुठीत धरुन पैलतिराचा प्रवास करावा लागत आहे. पुलाला कठडे नसल्याने अनेक प्रवासी वहानासगट नदीपाञात पडल्याच्या घटना घडलेल्या आहेत. या अपघातात त्यांना गंभीर इजाही झालेल्या आहेत तरीही जलसंपदा विभागाने उपारयोजना केलेली नाही.
पाण्याचा प्रवाह प्रचंड जोराचा आसल्याने काही वाहन धारकांचे नदी पाञाच्या मध्यावर गेल्यावर डोळे गरगरण्याचे प्रकार होत आहेत माञ जिव मुठीत धरुन पैलतिर गाठल्यावर वाहन चालक सुटकेचा निश्वास सोडताना दिसुन येतात. त्यामुळे एखादा गंभीर आपघात घडुन निष्पाप विटसरुचा बळी जाण्या आगोदरच मजबुत संरक्षक कठडे बसविण्याची मागणी दोन्ही बाजुच्या नागरीकांकडुन होत आहे.

LEAVE A REPLY

*