घोटी-सिन्नर मार्गावरील देवळे पूल वाहतुकीसाठी खुला

0

कावनई (वार्ताहर) ता. २ :
घोटी-नगर जिल्ह्याला जोडणाऱ्या व साई भक्त आणि पर्यटकांची वर्दळ असणाऱ्या घोटी सिन्नर रस्त्यावरील देवळे जवळील दारणा नदीवरील पूलाला वीस  दिवसापूर्वी भगदाड पडल्याने वाहतुकीसाठी तो बंद ठेवण्यात आला होता.

हा पूल आजपासून लहान व हलक्या वाहनांसाठी पुन्हा चालू करण्यात आला आहे.

घोटी सिन्नर रस्त्यावर दारणा नदीवर असलेल्या पुलाला 14 जुलै रोजी भगदाड पडून पुलाचा मलबा कोसळल्याने प्रशासनाने या बाबीची गंभीर दखल घेत या पुलावरील वाहतूक बंद केली होती.

यामुळे पूर्व भागातील नागरिकांना मुंढेगाव मार्गे किंवा शेणवड बु मार्गे लांबचा वळसा मारून जावे यावे लागत होते. तर भंडारदरा, राजूर, अकोले आदी भागातील वाहने कुरुंगवाडी मार्गे जात होती.

दरम्यान या बंद पुलामुळे वयोवृद्ध नागरिक, शालेय विध्यार्थी, रुग्ण यांची हेळसांड होत असल्याने पुलावरून किमान हलक्या वाहनाची    वाहतूक सुरू करावी अशी मागणी केली जात होती.

यानुसार या पुलाच्या दुरुस्तीचे काम जलदगतीने करीत आजपासून या पुलावरून हलक्या वाहनाची वाहतूक सुरू करण्यात आली आहे.

स्ट्रक्चर ऑडिट झाल्यानंतर अवजड वाहनाला प्रवेश

दरम्यान या पुलाच्या दुरुस्तीचे काम पूर्ण  झाल्यानंतर स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात येईल व त्यानंतर अवजड वाहनास प्रवेश दिला जाईल अशी माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता विलास आव्हाड यांनी दिली.

LEAVE A REPLY

*