Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

Video : तीन महिन्यापूर्वीचा व्हिडीओ अचानक व्हायरल

Share

नाशिक | प्रतिनिधी

सोशल मीडियात काहीही व्हायरल होऊ शकते याचा प्रत्यय आज नाशिकमध्ये आला. एप्रिल महिन्यात अधिक प्रवासी बसवल्याने एका रिक्षाचालकास वाहतूक शाखेच्या पोलिसांनी हटकले असता रिक्षा कट मारून दामटवली. त्यानंतर शिपायाकडून रिक्षातील प्रवाशी उतरवून रिक्षाचालकावर कारवाई करण्यात आली होती. यादरम्यान, पोलीस शिपायास ने या रिक्षा चालकास मारहाण करत धक्काबुक्की केली होती.

यादरम्यान, एका व्यक्तीने हा व्हिडीओ मोबाईलमध्ये रेकॉर्ड केला होता. त्यानंतर आज सकाळपासून अचानक हा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल झाला. अनेक ठिकाणी या व्हिडीओवर संतप्त प्रतिक्रिया उमटल्या.

वाहतूक शाखेच्या अधिकाऱ्यांनी या व्हिडीओबाबत स्पष्टीकरण देताना या रिक्षाचालकाकडे परवाना नव्हता, गणवेश आणि बिल्लाही नसल्याचे सांगण्यात आले. कधीकधी रिक्षाचालक ऐकत नसले तर सौम्य बळाचा वापर करावा लागतो असे एका अधिकाऱ्याने एका वेबसाईट सांगितले असल्याचे वृत्त आहे.

हेल्मेट सक्तीवरचा राग हा व्हिडीओ पसरवून अनेकांनी काढलेला दिसला. अनेकांनी तिखट प्रतिक्रिया दिल्या. दरम्यान, या घटनेची दुसरी बाजू जेव्हा तपासली तेव्हा लक्षात आले की, च्या थोडसे सखोलत जाऊन बघितले तर तीन महिन्यापूर्वी आपल्या हातून झालेली घटना अचानक व्हायरल झाल्याने हा कर्मचारी मानसिक तणावात असल्याचे सांगण्यात आले.

तर पोलिसांचे मनोबल यामुळे खचते. दररोज पोलिसांच्या पुढे अनेक आव्हाने असतात, हजारो प्रशांना उत्तरे द्यावी लागतात. सर्वकाही निस्तरले असताना अचानक हा व्हिडीओ व्हायरल झाला यामुळे वाईट वाटत असल्याचेही बोलले जात आहे.

असे आहे प्रकरण

या व्हिडीओ बाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, हा व्हिडिओ 19 एप्रिल चा आहे. तपोवन भागात कर्तव्यावर असताना सदर रिक्षा फ्रंट सीट प्रवासी बसवल्यामुळे ट्राफिकच्या कर्मचारी यांनी थांबवली. परंतु रिक्षावाला न थांबता त्यांना कट मारून शिव्या देत पळून गेला. मागून येणाऱ्या एका दुचाकी स्वाराने सुद्धा सांगितले की, तो त्यालाही कट मारून आला आहे.

त्यामुळे ट्राफिक पोलिसांनी पाठलाग करून सदर रिक्षा पकडली. त्याच्यावर कारवाई करत असताना त्याच्याकडे कोणतेही कागदपत्र नसल्याने त्याची रिक्षा जप्त करत असताना त्याने विरोध केला व शिवीगाळ केली. त्यामुळे पोलिसांना सौम्य बळाचा वापर करावा लागला. त्याच्या सोबत त्याचा लहान भाचा होता. त्याला एकटे सोडता येत नव्हते म्हणून सुरक्षेसाठी त्याला पोलिसांनी रिक्षा मध्ये बसवले. दरम्यान याप्रकरणाची चौकशी सुरु असल्याची माहिती वाहतूक शाखेचे सहायक पोलीस आयुक्त अशोक नखाते यांनी दिली आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!