Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

मुंबई आग्रा महामार्गावरील कसारा घाटातील वाहतुक गेल्या दोन तासांपासुन ठप्प

Share

इगतपुरी । प्रतिनिधी

मुंबई आग्रा महामार्गावरील नवीन कसारा घाटातील एकेरी वाहतुकीमुळे वाहतुक गेल्या दोन तासांपासुन ठप्प झाल्याने घाटात वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याने मोठी वाहतुक कोंडी झाली आहे.

याबाबत माहीती अशी की मुंबई आग्रा महामार्गावरील जुन्या कसारा घाटातील मार्गावरील रस्त्यावर भेगा पडल्याने रस्ता खचत चालला होता. रस्ता दुरुस्त करण्यासाठी गेल्या तीन दिवसांपासुन जुना कसारा घाटातील मुंबईहुन नाशिकला येणारी वाहतुक नाशिकहुन मुंबईला जाणाऱ्या नवीन घाटातुन वळविण्यात आल्याने घाटात नेहमीच वाहतूक कोंडीला समोरे जावे लागत होते. यामुळे वाहतुक संथ गतीने सुरु असते.

मागेच दोन महिण्यापुर्वीच कसारा घाटातील रोडचे दुरुस्तीचे काम हाती घेतले होते. त्यावेळी एकेरी वाहतूक चालु होती त्यामुळे कित्येक वाहानांचे अपघात झाले आहे असुन त्यात कित्येकांना आपला जीव गमवावा लागला होता.

या रोडचे काम पूर्ण होऊन महिनाही उलटला नसुन पहिल्या पावसातच संपूर्ण रोड खड्डेमय झाला आहे. आता पुन्हा या ठेकेदाराने ” येरे माझ्या मागल्या म्हनी ” प्रमाणे कसारा घाटातील रोडचे डागडुजी करण्यातसाठी कामाला सुरुवात केली आहे.

परंतु पुन्हा मागच्या सारखेच स्वतची मनमानी करुन जुना कसारा घाट पुर्णत बंद करुन नवीन घाटातुन एकेरी वाहतूक चालु केली आहे. यामुळे घाटात वाहतुक कोंडी होत आहे.

दोन तासांपासुन ठप्प असलेल्या नवीन कसारा घाटात अखेर महामार्ग सुरक्षा पोलीसांनी घटनास्थळी धाव घेऊन ही वाहतुक कोंडी फोडण्याचा प्रयत्न केला.

धुक्यामुळेही वाहतूक कोंडीत भर

कसारा घाटात दाट धुके जमले होते. त्यामुळे सकाळी वाहतूक कोंडीत धुक्यामुळेदेखील मोठी भर पडली. सर्वच वाहनांना लाईट सुरु ठेवून मार्ग काढावा लागला.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!