Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

नाशिक : गंगापूर रोडवर वाहतूक कोंडी; वाहनांच्या लांबच लांब रांगा

Share

नाशिक | प्रतिनिधी 

शहरातील व्ही. एन. नाईक शिक्षण संस्थेचे मतदान आज सकाळी ७ वाजेपासून सुरु आहे. यादरम्यान दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास गंगापूर रोड, कॅनडा कॉर्नरकडून येणाऱ्या रस्त्यावर प्रचंड वाहतूक कोंडी झाली. वाहतूक शाखेचे कर्मचारी याठिकाणी वाहतूक कोंडी फोडण्याचा प्रयत्न करत होते, मात्र वाहनांच्या एक किमीपर्यंत रांगा लागल्यामुळे सर्वसामान्य नाशिककरांना आजच्या मतदानप्रक्रियेचा फटका बसला.

क्रांंतीवीर वसंतराव नाईक शिक्षणसंस्थेचा पंचवार्षिक निवडणूकीत सत्ताधारी कोंडाजी मामा आव्हाड व हेमंत धात्रक यांच्या नेतृत्वाखालील प्रगती व तुकाराम दिघोळे व पंढरीनाथ थोरे यांच्या नेतृत्वाखालील क्रांतीवीर पॅनलमध्ये सरळ-सरळ लढत होत आहे.

शिक्षण संस्थेची व्याप्ती मोठी असल्यामुळे जिल्हाभरातून सदस्य मतदार मतदानासाठी नाशिकमध्ये दाखल झाले आहेत. प्रत्येकजण आपापले वजन दाखविण्यासाठी कार्यकर्त्यांसह संस्थेच्या मतदान केंद्र परिसरात दाखल झाल्याने गर्दीत मोठी भर पडली आहे.

दुपारी मात्र, गर्दीत अचानक वाढ झाली. डोंगरे वसतीगृह मैदान परिसरापासून वाहनांच्या केटीएचएम महाविद्यालयापर्यंत लांबच लांब रांगा लागलेल्या दिसून आल्या. नियमित सुरळीत असलेला गंगापूर रोड आज वाहतूक कोंडीच्या फेऱ्यात अडकलेला दिसून आला.

प्राप्त माहितीनुसार घटनास्थळी वाहतूक शाखेच्या अधिकाऱ्यांसह अतिरिक्त कर्मचारी दाखल झाले असून वाहतूक कोंडी फोडण्याचा प्रयत्न ते करत असल्याची माहिती प्रतिनिधीने दिली.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!